सोलापूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून १ जुलै रोजी साजरा होणाऱ्या ‘कृषी दिना’निमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे विशेष ‘कृषी पुरस्कार वितरण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. भाजप ओबीसी मोर्चा (सोलापूर पूर्व) यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार यांनी ही माहिती दिली.
हा सोहळा कारंबा येथील बहिर्जे नगर येथे सायंकाळी साडेसहा वाजता संपन्न होईल. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, सोलापूर बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते, कृषी समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी बोराडे, उपसभापती सुनील भोसले, सदस्या सुनीता बारसकर, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष संभाजी दडे आणि उद्योजक नागनाथ बन्ने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भव्य सभागृहाचे लोकार्पण:
कृषी क्षेत्रात आणि कृषीपूरक व्यवसायात आधुनिक तसेच प्रयोगशील पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना या सोहळ्यात कृषी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) वतीने उभारण्यात आलेल्या भव्य सभागृहाचे लोकार्पणही याप्रसंगी केले जाणार आहे. या सोहळ्याला परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विनायक सुतार आणि भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुरस्कार विजेते शेतकर
- आदर्श शेतकरी: विजय भोरे
- आदर्श कृषी आधारित उद्योजक शेतकरी: ज्योतिष गुंड
- नैसर्गिक विषमुक्त शेती: गणेश भुट्टे
- आदर्श महिला शेतकरी: महानंद गुडे
- आदर्श फूल उत्पादक शेतकरी: अशोक बहिर्जे
- युवा शेतकरी: अक्षय गव्हाणे
- दुग्धउत्पादक शेतकरी: विशाल माने, श्रीधर गायकवाड, संजय बहिर्जे आणि हरीश जाधव.





















