माळशिरस : तालुक्यात जून महिन्याच्या अखेरीस आद्रा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून या पावसामुळे रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या उघडपी नंतर सुरू होणार असून या झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तालुक्यात पूर्व भागापेक्षा पश्चिम भागातील भांब ,रेडे,जळभावी ,गारवाड यासह अनेक गावात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. आठ व नऊ जून रोजी झालेला पाऊस व रविवारी २८ जून रोजी झालेल्या पावसामुळे आता तालुक्यात सर्वत्र जमिनीस वापसा आल्यानंतर खरीपच्या पेरण्या चालू होतील.
तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीस काही भागात पावसाने हजेरी लावली होती .त्यामुळे काही प्रमाणात खरीपाच्या पेर चालू झाल्या होत्या परंतु त्यानंतर पूर्ण जून महिना संपत आला तरी समाधानकारक पावसाने हजेरी न लावल्याने खरिपाची पेर कधी होणार या चिंतेत शेतकरी वर्ग होता. सर्वसाधारण जून महिन्यात तालुक्यात खरीपाची पेर चालू होते खरीपाच्या पेरसाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या मशागती करून ठेवल्या होत्या परंतु पाऊस लांबल्याने खरिपाच्या पेरेही लांबल्या होत्या.
या आधीची सर्व पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्यामुळे तालुक्यात खरिपाच्या पिकासाठी चांगल्या व समाधानकारक पावसाची आवश्यकता होती रविवारी दुपारी अचानक हवामानात बदल होऊन तालुक्याच्या अनेक भागात चांगल्या व समाधानकारक पावसाने हजेरी लावली काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाल्याने बळीराजा खरीपाचे पेर करण्यासाठी सज्ज झाला आहे. तालुक्यात खरीपाचे क्षेत्र चौदा हजार ६५२ हेक्टर असून यामध्ये मका, बाजरी, कांदा व चारा पिके घेतली जातात खरीपापासून शेतकऱ्यांना चांगली उत्पन्न मिळत असल्याने तालुक्यात खरीपाची पेर मोठ्या प्रमाणात होत असते.
चौकट
तालुक्यात जून महिन्यामध्ये ९३ . ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वात जास्त पाऊस आठ जून रोजी ४८ . २ मिलिमीटर तर ९ जून रोजी २० . ७ मिमी झाला असून सर्वात कमी पाऊस २३ जून रोजी ० . १ मिलिमीटर झाला आहे .
Post Views: 28