सोलापूर : शहरातील इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळील धोकादायक पूल नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वापरास प्रतिबंधित करण्यात आला आहे. याबाबतचा सूचना फलकही संबंधित ठिकाणी लावण्यात आला असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या वाहनांसाठी या पुलाचा वापर करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुलाची पाहणी केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. झोन क्रमांक ७ आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने संयुक्तपणे ही कार्यवाही पूर्ण केली.
महापालिका प्रशासनाने नागरिकांनी सूचना फलकाचे पालन करून धोकादायक पुलाचा वापर टाळावा तसेच सुरक्षित पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
Post Views: 15