प्रथम चैतन्य कुटीचे प्रमुख श्रीपाद तिर्थस्वामी महाराज यांचे हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी श्रीपाद तिर्थस्वामी महाराज यांनी सद्य परिस्थितीत रक्ताची गरज व सामाजीक उपक्रम म्हणून प्रथमच चैतन्य कुटीचे वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले असल्याचे सांगितले .
अकलुज येथिल स . म . शंकरराव मोहीते पाटील ब्लड बॅन्केच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.
यावेळी डॉॅ . अजित गांधी, सुमन धेंन्डे, अजित लोखंडे, विद्या काळे, पल्लवी शीरसागर , अभिजीत पाटील, राजू दोरकर, ब्रिमा सागरचे अधिकारी धनंजय कुलकर्णी , अभिजित आहेरसिंग, डॉ . प्रकाश शिन्दे उपस्थित होते .
शिबीर यशस्वी करण्यासाठी गोरख काटकर , लक्ष्मण लोखंडे , अक्षय राऊत, संतोष सटाणे , अभिषेक कोळी, तुषार नाळे यांनी परिश्रम घेतले .





















