वळसंग – ‘तरुण भारत’ वृत्तपत्रामध्ये वळसंग येथील सांडपाण्याच्या समस्येबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे. वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील वार्ड क्रमांक ३ मधील आचेगाव रोड ते बसवेश्वर मंदिर पर्यंतच्या सी.सी. (कंक्रीट) रोडच्या कामाचा आज अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला.काही दिवसांपूर्वीच या परिसरात रस्त्यावर सांडपाणी साचल्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. ‘तरुण भारत’ने या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीची तात्काळ दखल घेत विद्यमान सरपंच श्री. जगदीश दयानंद आंटद यांनी तातडीने निर्णय घेतला आणि ग्रामनिधीतून या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली.
या रस्त्याचे आणि बंद गटरीचे काम सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी भूमिपूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य श्री. विनोद सुरपुरे यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून या कामाची अधिकृत सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शालम अमलीचुंगे, अनिल बर्वे, सिद्धाराम वाघमारे, मलकाप्पा कोडले, श्रीशैल भुसणगी, इसाक अत्तार, खंडू वाघमारे आदि मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 39