अक्कलकोट – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मैंदर्गी रस्त्यावरील स्वामिनी पार्क मधील श्री गणेश मंदिरात शुक्रवारी संकष्टी चतुर्थी मोठ्या भक्ती भावाने साजरी करण्यात आली. संकष्टी चतुर्थी निमित्त स्वामिनी पार्क मधील श्री गणेश मंदिरात सायंकाळी बालाजी सुंटनुरे व विजयालक्ष्मी सुंटनुरे या दांपत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजेनंतर उपस्थित गणेश भक्तांना प्रसाद रुपी मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. पूजेचे मानकरी बालाजी सुंटनुरे व विजयालक्ष्मी सुंटनुरे यांचा सत्कार अरविंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अतुल जाधव , माजी सैनिक श्रीकांत मोरे , जयसिंग शिर्के , पिंटू गोंधळ ,प्रवीण घाडगे , गोटू माने , निखिल पाटील , सेवानिवृत्त होमगार्ड अधिकारी हंद्राळमठ , प्रतिभा जाधव , अश्विनी सिंदगीकर ,सुरेखा होदलूरे , नम्रता सगर ,दीपिका बकरे आदींसह बालगोपाळांसह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 8