मंगळवेढा – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील दिवाणी न्यायालयात दि. १८ जुलै २०२६ रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष लोकअदालतीमध्ये भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा, १८८१ मधील कलम १३८ अन्वये दाखल प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. धनादेश अनादर (Cheque Bounce) संबंधी प्रलंबित प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्याची संधी पक्षकारांना उपलब्ध होणार आहे.
लोकअदालतीत तडजोडीने निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे पक्षकारांचा वेळ, पैसा व श्रम यांची बचत होते. तसेच परस्पर संमतीने वाद मिटविण्याची प्रभावी संधी उपलब्ध होत असल्याने संबंधित पक्षकारांनी या विशेष लोकअदालतीचा लाभ घ्यावा तसेच भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा, १८८१ मधील कलम १३८ अंतर्गत प्रलंबित प्रकरणांतील फिर्यादी व आरोपी यांनी आपल्या वकिलांमार्फत अथवा थेट न्यायालयाशी संपर्क साधून लोकअदालतीत प्रकरण ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन न्या. वृषाली पाटील यांनी केले आहे.
Post Views: 6