Tuesday, September 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आषाढी यात्रा केवळ पंधरा दिवसांवर येवून ठेपली तरी सरकारी बाबुंचा कारभार धिम्मच..

तरुण भारतbyतरुण भारत
July 7, 2026
in west maharashtra
0
आषाढी यात्रा केवळ पंधरा दिवसांवर येवून ठेपली तरी सरकारी बाबुंचा कारभार धिम्मच..
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – आषाढी यात्रा केवळ पंधरा दिवसांवर येवून ठेपली आहे. तरी देखील केवळ बैठकांच्या फार्स शिवाय सरकारी बाबूंकडून कोणत्याची कामांची प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही. पंढरपूरात पाहिले तर यात्रेच्या नियोजनाची कोणतीही तयारी इथे अजून दिसत नाही आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे असो की चंद्रभागेच्या वाळवंटातील ढिगारे उपासण्याचे काम असो सर्व परिस्थिती जैसे थी अशीच आहे. त्यामुळे जगतगुरु तुकोबारायांच्या अभंगातील संतवचना प्रमाणे मारीतसी बोंब, परी न ऐकती । उघडली दृष्टी,तरी न देखती ।। अशीच काहीशी अवस्था दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पंढरपूरात झालेली असून पंढरपूरकरांनी कितीही बोंब मारली तरी सरकारी अनास्था आहे तशीच राहणार…
राज्याचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा म्हणून आषाढी यात्रेचा आवर्जुन नामोल्लेख केला जातो. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या अगोदरच कँलेंडर नवीन वर्षाचे कँलेंडर प्रसिध्द होत असते. त्या मध्ये आषाढी एकादशी किती तारखेला आहे हे ठळकपणे छापलेले असते. त्यामुळे आषाढी यात्रेची निगडीत विविध कामे अगोदरच एक, दोन महिने सुरु करणे अपेक्षीत असते. कारण पुरेसा वेळ मिळाला तर केलील जाणारी विविध विकास कामे ही दर्जेदारपणे होतात. मात्र तसे न करता आषाढी एकादशीच्या अगोदर दोन,चार दिवस यात्रेशी संबंधित असलेली शहरातील विविध विकास कामे घाईगडब़डीत उरकून विविध शासकीय विभागांचे आधिकारी ( ठेकेदारांशी असलेल्या अर्थपुर्ण मैत्रींमुळे ) कशीबशी यात्रा पार पाडीत असतात.
त्यामुळेच तमाम पंढरपूरकर नागरिकांकडून यात्रेसाठीच्या लाखों, कोट्यावधींच्या मंत्र्यांसंत्यांकडून केल्या जाणाऱ्या शासकीय निधीच्या घोषणेवर वारी वारकऱ्यांची नव्हे तर आधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांचीच असते असे उपरोधाने बोलतात. मात्र हे जरी शासकीय यंत्रणेला ठाऊक असले तरी याचे कोणतेच सोयरसुतक या निढार्वलेल्या सरकारी यंत्रणेला नसते याचि प्रचिती यावेळीही शहरात दिसून येते. कारण नुकतेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी येथे येवून यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना यात्रेच्या कामांच्या संदर्भात त्वरीत पाऊले उचलण्यास सांगितले.
कारण यात्रेच्या दृष्टीने शहरातील रस्ते, चंद्रभागा वाळवंटातील राडारुडा, कडेला पडलेले मातीचे ढिगारे उपसणे, पासष्ठ एकरची मलपट्टी, पालखी तळांवरील विविध कामे, तात्पुरच्या बसस्थानकांच्या परिसरातील जमीन सपाटीकरण, मुरुमीकरणांसारखी कामे, स्वच्छतागृहे,शौचालये, वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणारे जर्मन हँगरची कामे ही दर्जेदारपणे होणे अपेक्षीत असते. मात्र सरकारी अनस्थेपुढे हे सर्व झुठ आहे.
कारण शहरातील प्रमुख रस्त्यांची आजची परिस्थिती पाहिली तर खूपच भंयकर अशी झालेली दिसत आहे. कारण नगरप्रदक्षिणा सारख्या रस्त्यांची जर वाईट स्थिती असेल तर इतर रस्त्यांच्या बाबतीत विचार देखील न केलेला बरा. मात्र सरकारी बाबू एकादशीच्या अगोदर एका रात्रीतून शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे ( खऱ्या डांबराविना केवळ आँईलमिश्रीत डांबरसदृश्य तेल वापरुन) खडीचा मुलामा देवून बुजविण्यात तरबेज असतात. यात्रा काळात थोडाजरी पाऊस पडला तरी वारकरी भाविकांचे बेहाल होतात. मात्र गर्दीच्या काळात बिचारे वारकरी ( खरा वारकरी कितीही त्रास झाला तरी कोणतीही तक्रार करीत नसतो. तो पांडुरंगाच्या दर्शनासाठी केवळ आसुसलेला असतो ) दाद मागणार किंवा तक्रार करणार तरी कुणाकडे.
राज्याचे मख्यमंत्री शासकीय महापुजेसाठी अगदी वेळात वेळ काढून येथे येत असतात. मुख्यमंत्री ज्या मार्गावरुन मंदिरात जाणार ( तेही मध्यरात्री गाडीतून जाणार) तेवढ्याच मार्गाची मलमपट्टी केली की शासकीय बाबूंचे काम झाले. पहाटे पुजे नंतर मुख्यमंत्र्यांचे येथून मुंबईच्या दिशेने हेलिकाँप्टर झेपावले की शासकीय आधिकाऱ्यांच्या दृष्टीने आषाढी यात्रा संपली असे समजून सुटकेचा निश्वास टाकला जातो. मग वारकरी काय आणि वारी काय अशी अवस्था एकंदरीतच पंढरपूरची होते. त्यामुळे पंढरपूरकरांनी कितीही बोंब मारली तरी आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही असा एकंदर समज शासकीय यंत्रणांचा होवून बसलेला आहे.
त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच यात्रेशी संबंधित विविध खात्याचे किंवा विभागाचे मंत्री यांनी कोणताही गाजावाजा न करता येथे येवून यात्रेच्या अगोदर होत असलेल्या कामांची पाहणी करुन आधिकाऱ्यांना जाब विचारणे गरजेचे आहे.
कारण कोट्यावधी रुपयांचा निधी केवळ अनाठायी खर्ची पाडून जर बिचाऱ्या वारकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ मिळणार नसेल तर शासनाच्या यात्रा नियोजनाचा काय उपयोग ? त्यामुळे हा सर्व अनागोंदी कारभार केवळ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उघड्या डोळ्यांनी पाहून सरकारी अनस्थे विषयी फक्त आणि फक्त बोंब मारण्या पलिकडे समस्त पंढरपूरकरांच्या हातात कोणताच पर्याय उरणार नाही.
————————-
चौकट : ( एकनाथ शिंदेंनी सुरु केली नवीन परंपरा )
आषाढी यात्रेच्या अगोदर येवून शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या यात्रा नियोजन पाहण्याची तसदी यात्रेपूर्वी कोणतेही मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री घेत नव्हते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय पूजे अगोदर पंढरपूरचा दौरा करुन येथील कामांची पाहणी केलेली होती. त्यावेळी त्यांनी दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट येथे वारकऱ्यांशी थेट संपर्क करुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या. त्या संदर्भात वारकऱ्यां समोरच आधिकाऱ्यांना देखील त्यांनी खडे बोल सुनावले होते. मागील वर्षी देखील उपमुख्यमंत्री असताना त्यांनी येथे येवून कामांची पाहणी केलेली होती.
————————–
चौकट : ( मुख्यमंत्र्यांनी देखील अगोदर येवून पाहणी करावी )
एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शासकीय महापुजेच्या अगोदर येथे येवून अगदी वाखरी पासून ते चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग, विविध मठ, धर्मशाळा, पासष्ठ एकर आदी ठिकाणां पर्यंत प्रत्यक्ष भेट देवून वारकऱ्यांशी संवाद साधून यात्रेच्या सर्व तयारीचा आढावा घ्यावा अशी मागणी पंढरपूरवासियांकडून केली जात आहे.
—————
Post Views: 45
Previous Post

पंढरपूरकरांनी सायकल वारीत सहभाग नोंदवावा:- उमेश परिचारक

Next Post

महूद-पंढरपूर पालखी मार्गावरील चिलार काढण्याची मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महूद-पंढरपूर पालखी मार्गावरील चिलार काढण्याची मागणी

महूद-पंढरपूर पालखी मार्गावरील चिलार काढण्याची मागणी

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1208142

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!