माळशिरस – भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालय, जाधववाडी यांनी शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत . राज रामचंद्र ढगे व अनुष्का विजय चव्हाण हे विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत समर्थ श्रीकांत सावंत याने जिल्हास्तरावर यश संपादन केले असून एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठीही पात्र ठरत दुहेरी यश मिळविले आहे. तसेच सातारा सैनिक स्कूल प्रवेशासाठी नमन विक्रम धाईंजे याची निवड झाली आहे.
या यशामागे बनसोडे मॅडम यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम मोलाचे ठरले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव, मुख्याध्यापक नानासो घार्गे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
Post Views: 13