मंगळवेढा – ग्रामीण रुग्णालयात एकूण 13 विविध पदे रिक्त असल्याने येथील कर्मचार्यांना मोठी कसरत करीत सेवा बजवावी लात आहे. दरम्यान पुणे आरोग्य विभागाचे उपसंचालक यांनी येथील तात्काळ रिक्त पदे भरावीत अशी मागणी होत आहे.

मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दैनंदिनी 350 ते 400 रुग्ण उपचारासाठी येत असतात. येथील बेड संख्या 30 आहे. सध्या नैसर्गिक वातावरणात बदल झाल्यामुळे नागरिक व लहान बालके आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून तुटपुंज्या कर्मचार्यामुळे येथील सेवेवर विपरीत परिणाम होत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना आपली ड्यूटी करुन उर्वरीत कालावधीतही अतिरिक्त काम करण्याची वेळ कर्मचार्यावर येत असल्याने मानसिकता ढासळत चालली आहे. रिक्त पदे पुढील प्रमाणे-नर्सिंग मंजूर पदे 7 कार्यरत 3, मेडिकल ऑफिस 3 मंजूर रिक्त 1,सफाई कामगार 1 रिक्त,ऑफिस लिपीक मंजूर 2 रिक्त 1, सहाय्यक अधिक्षक 1 रिक्त,शिपाई 1 रिक्त,कक्षसेवक 4 मंजूर रिक्त 1,चालक 1 रिक्त,औषध निर्माण अधिकारी 2 मंजूर रिक्त 1 असे एकूण 13 विविध पदे रिक्त आहेत. मध्यंतरी खा.प्रणिती शिंदे यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिल्यानंतर कर्मचारी रिक्त पदांची माहिती जाणून घेतली मात्र अद्यापही कर्मचारी रिक्त पदे भरली गेली नाहीत. सध्या सर्वच शासकीय कार्यालयात संगणकीय कामकाज सुरु असून येथे केवळ तीन संगणक असल्यामुळे कामकाजाच्या नोंदी करणे तारेवरची कसरत बनत आहे. पुरेशा प्रमाणात संगणक ग्रामीण रुग्णालयास मिळाल्यास कामाला गती मिळेल. या रुग्णालयात वर्षभरात 1 हजार 6 महिलांच्या डिलीव्हरी करण्यात आल्याने जिल्ह्यात मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय अव्वल ठरले आहे. येथे डिलीव्हरीसाठी येणार्या महिलांची संख्या दिवसेंदिवस सोयी सुविधामुळे वाढत चालली असून अजून काही साधनांचा अभाव असल्याने ती साधने मिळाल्यास अजूनही महिलाच्या डिलीव्हरी केसेस वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Post Views: 9