Thursday, July 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरच्या १३७८ कोटींच्या पाणी योजनेला गती; २० जुलैपूर्वी अंतिम टीपीआर सादर करा : परदेशी

तरुण भारतbyतरुण भारत
July 9, 2026
in solapur
0
सोलापूरच्या १३७८ कोटींच्या पाणी योजनेला गती; २० जुलैपूर्वी अंतिम टीपीआर सादर करा : परदेशी
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : शहराच्या भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित १३७८ कोटी रुपयांच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा योजनेला गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांचे सल्लागार तथा ‘मित्रा’चे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत २० जुलैपूर्वी अंतिम तांत्रिक प्रकल्प अहवाल (टीपीआर) शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
        तसेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निविदा प्रक्रिया सुरू करून पुढील दोन ते अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले.या बैठकीस महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          बैठकीत अंतिम टीपीआर, जागतिक बँकेकडून प्रस्तावित कर्ज, निधी नियोजन आणि प्रशासकीय प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. टीपीआर मंजूर झाल्यानंतर नगरसेवकांच्या सहभागातून शहरातील विविध भागांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेग देण्यात येणार आहे.
          योजनेच्या निविदा प्रक्रिया सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्याचे नियोजन असून, निविदा अंतिम झाल्यानंतर कामाला तातडीने सुरुवात केली जाणार आहे. संपूर्ण प्रकल्प दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यासाठी आवश्यक सर्व पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
          जागतिक बँकेकडून प्रस्तावित कर्जाबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर आर्थिक प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेचे आधुनिकीकरण, नवीन जलवाहिन्यांचे जाळे, जलसाठा केंद्रे आणि सक्षम वितरण व्यवस्था उभारली जाणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन सोलापूरकरांना दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सोलापूरकरांना पुरेसा पाणीपुरवठा
 करणे हेच प्रमुख उद्दिष्ट : महापौर कोंड्याल
         महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, “सोलापूरच्या भविष्यासाठी ही पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रवीणसिंह परदेशी यांच्या सहकार्यामुळे योजनेला गती मिळाली आहे. २० जुलैपूर्वी अंतिम टीपीआर शासनाकडे सादर करून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सोलापूरकरांना दीर्घकालीन आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
 योजनेची ठळक वैशिष्ट्ये
– प्रकल्पाची किंमत : १३७८ कोटी रुपये
– २० जुलैपूर्वी : अंतिम टीपीआर शासनाकडे सादर
– सप्टेंबर-ऑक्टोबर : निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन
– कालावधी : दोन ते अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
– निधी : जागतिक बँकेच्या प्रस्तावित कर्जाचा विचार
– फायदा : आधुनिक जलवाहिन्या, जलसाठा व्यवस्था आणि दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा.
Post Views: 32
Previous Post

भीमा खोऱ्यातील पावसाची उघडीप; सर्व धरणांतील विसर्ग बंद

Next Post

माळशिरस बस स्थानकात मॉब ड्रिल ची रंगीत तालीम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
माळशिरस बस स्थानकात मॉब ड्रिल ची रंगीत तालीम

माळशिरस बस स्थानकात मॉब ड्रिल ची रंगीत तालीम

ताज्या बातम्या

उड्डाणपूलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या जागा त्वरित घ्या -प्रविणसिंह परदेशी #viral #solapurnews

July 9, 2026

बी 2 सत्ता प्रकार पाठपुरावा यशाचा आनंद साजरा करतानाचे क्षण…. #viral #marathinews #solapurnews

July 9, 2026
श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग

श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग

July 9, 2026
माळशिरस बस स्थानकात मॉब ड्रिल ची रंगीत तालीम

माळशिरस बस स्थानकात मॉब ड्रिल ची रंगीत तालीम

July 9, 2026
सोलापूरच्या १३७८ कोटींच्या पाणी योजनेला गती; २० जुलैपूर्वी अंतिम टीपीआर सादर करा : परदेशी

सोलापूरच्या १३७८ कोटींच्या पाणी योजनेला गती; २० जुलैपूर्वी अंतिम टीपीआर सादर करा : परदेशी

July 9, 2026
भीमा खोऱ्यातील पावसाची उघडीप; सर्व धरणांतील विसर्ग बंद

भीमा खोऱ्यातील पावसाची उघडीप; सर्व धरणांतील विसर्ग बंद

July 9, 2026
उघड्या ११ केव्ही वीज वाहिनीचा शॉक, सुदैवाने जीव वाचला, पण गंभीर जखमी

उघड्या ११ केव्ही वीज वाहिनीचा शॉक, सुदैवाने जीव वाचला, पण गंभीर जखमी

July 9, 2026
महिला आरोग्य समित्या म्हणजे समाजाच्या निरोगी भविष्यासाठी सक्षम यंत्रणा : न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

महिला आरोग्य समित्या म्हणजे समाजाच्या निरोगी भविष्यासाठी सक्षम यंत्रणा : न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

July 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0967015

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!