माळशिरस – आषाढीवारी 2026 च्या अनुषंगाने एसटी स्टँड माळशिरस येथे तेररर, आतंगवादी घुसले तर काय करावयाचे याची मॉब ड्रिल ची रंगीत तालीम घेण्यात आली.
आषाढीवारी 2026 च्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अड अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,डी.वाय एस पी ,संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि दशरथ वाघमोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माळशिरस बस स्थानक येथे मॉब ड्रिलची रंगीत तालीम केली .

माळशिरस बस स्थानकातून माळशिरस पोलिसांना बस स्थानकात संशयित व्यक्ती व संशयित बग असल्याचा फोन आला .तात्काळ माळशिरस पोलीस घटना स्थळी पोहचले ,त्यांनी त्वरित सोलापूर कंट्रोल,आर सी.पी .दहशतवाद विरोधी पथक यांना माहिती दिली .बोंब नाशक पथकास बोलावून घेण्यात आले.पथकांनी संशयित दोघांना ताब्यात घेतले बग असलेल्या ठिकाणच्या प्रवाशांना बाजूला करण्यात आले.ति बग ताब्यात घेऊन बोंब नाशक पथकाने सुरक्षित ठिकाणी नेली .एवढी मोठी पोलीस यंत्रणा पाहून नागरिकात गोंधळ उडाला ,काय झाले कोणाला समजेना .बस स्थानकात बोंब होता पथकाने बोंब असलेली बग नेली हे समजल्यावर त्यांना धीर आला .सर्व प्रकारानातर हि रंगीत तालीम असल्याचे समजल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला
या मॉब ड्रिल साठी माळशिरस पोलीस ठाणे कडील 1अधिकारी 18 पोलीस अंमलदार, सुरक्षा शाखा सोलापूर ग्रामीण कडील 1 अधिकारी 1 अंमलदार, एटीसी सोलापूर कडील 3 अ अंमलदार, क्यू आर टी पथकाचे 7 अंमलदार, आरसीपी पथकाचे 14 अंमलदार व बीडीएस पथकाचे 5 आमदार व 1 श्वान, जिल्हा वाहतूक सोलापूर ग्रामीण कडील 1 अधिकारी, 4 पोलीस अंमलदार, ग्रामीण रुग्णालय माळशिरस कडील 1 सुसज्ज अंबुलन्स व नगरपंचायत माळशिरस कडील फायर ब्रिगेडचे 1 वाहन उपस्थित होते.






















