सोलापूर – छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या लॉन टेनिस संघाने सलग चौथ्या वर्षी विजेतेपदावर आपले नाव कोरून दबदबा कायम राखला आहे. या दमदार कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाचे खेळाडू चंद्रकांत वाघमोडे, प्रशांत केदार आणि बालाजी केदार यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघात निवड झाली.
नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत या तिन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. त्यांच्या मोलाच्या योगदानामुळे विद्यापीठाचा लॉन टेनिस संघ ‘अखिल भारतीय आंतरविद्यापीठ लॉन टेनिस स्पर्धेसाठी’ पात्र ठरला आहे.
या यशस्वी खेळाडूंना प्रा. संतोष गवळी, प्रा. सचिन गायकवाड, शिवाजी वसपटे आणि टेनिस प्रशिक्षक महेश झांबरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहरपंत सपाटे, जनरल सेक्रेटरी प्रा. महेश माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मोटे, प्रा. अमोल वाघमोडे आणि प्रा. नवनाथ कुचेकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून, आगामी अखिल भारतीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
——



















