Wednesday, August 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

३० कोटींच्या ठेवींसाठी बंधन बँकेचा प्रस्ताव फेटाळला

तरुण भारतbyतरुण भारत
July 10, 2026
in solapur
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि जीएसटी अनुदानाच्या मिळून ३० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी बंधन बँकेत ठेवण्याचा वादग्रस्त प्रस्ताव अखेर स्थायी समितीने फेटाळला. सार्वजनिक निधीच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही रक्कम आयसीआयसीआय बँकेत मुदत ठेव म्हणून गुंतविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. तसेच एयू फायनान्स बँकेत असलेल्या मुदत ठेवी काढून त्या राष्ट्रीयीकृत बँकेत वर्ग करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले.
         महापालिका स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा कर्मचाऱ्यांच्या हक्काचा निधी असून, त्याच्या गुंतवणुकीत केवळ अधिक व्याजदर नव्हे तर निधीची सुरक्षितता, बँकेची विश्वासार्हता आणि आर्थिक स्थैर्य या बाबींनाही प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका सभापती चाकोते यांनी मांडली.
महापालिकेने मुदतठेवींसाठी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून व्याजदर मागविले होते. त्यामध्ये बंधन बँकेने वार्षिक ७ टक्के व्याजदराची ऑफर दिल्याने प्रशासनाने त्या बँकेत ३० कोटी रुपयांची मुदत ठेव करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता. मात्र या प्रस्तावावर सभेत आक्षेप नोंदविण्यात आला. तत्पूर्वी नगरसेविका श्रद्धा पवार यांनी बंधन बँकेत ठेवी ठेवण्यास विरोध दर्शवत राष्ट्रीयकृत बँकेत ठेवी ठेवण्याची मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. हा प्रस्ताव वादग्रस्त ठरला होता. आय सी आय सी बँकेकडून 6.60 टक्के व्याज दर मिळणार आहे.
    दरम्यान या सभेत महापालिकेच्या सन २०२५-२६ च्या  अंदाजपत्रकातील विविध देखभाल दुरुस्ती, निवडणूक मानधन व इतर लेखाशीर्षकांमधून झालेल्या कामांची सुमारे 45 कोटींची बिले माहे मार्च २०२६ अखेर अदायगीसाठी प्रलंबित होते. सद्यस्थितीत २८ कोटींची मक्तेदारांची बिलाची रक्कम अदायगी साठी प्रलंबित आहे. आयुक्तांच्या मान्यतेने हा प्रस्ताव आला होता. यामध्ये प्रलंबित देयकांच्या आदायगीसाठी २८ कोटींची वाढीव तरतूद  करण्याकरिता सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रक बजेट लेखा शीर्षकात अंतर्गत तरतूद करण्यासाठी प्रस्ताव आला होता. त्यावर दीर्घ चर्चा झाली. या विषयावर आक्षेप नोंदविण्यात आले. नगर अभियंता आणि मुख्यलेखापाल विभाग यांच्यात दोन मतप्रवाह असल्याचे दिसून आले. बजेट लेखा शीर्षकातून वाढ व कमी करण्यास मानण्यात देण्यात येत असली तरी 28 कोटींची बिले अदा करण्यापूर्वी स्थायीची मान्यता
 घेणे आवश्यक आहे. व्यवस्थित बिले सादर करण्यासाठी एक महिन्याचे मुदत दिली आहे. यामुळे हा निर्णय स्थगित (होल्ड) ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सभापती रंजीता चाकोते यांनी दिली.
    याच सभेत रस्त्या संदर्भातील विविध ७ विषयांना मान्यता देण्यात आली. या अंतर्गत सुमारे ४४रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर महापालिकेतील गट क अंतर्गत 51 पदे भरण्यात आले आहेत उर्वरित 51 पदे आऊटसिंगद्वारे भरण्यास स्थायी समितीने यावेळी मान्यता दिली. आयुक्तांकडून तातडीचा विषय मान्यतेसाठी पाठविला होता.
 एयू फायनान्स बँकेतील १४ कोटींच्या ठेवी
 राष्ट्रीयीकृत बँकेत वर्ग करण्याचा निर्णय
        चर्चेनंतर स्थायी समितीने बंधन बँकेतील प्रस्ताव फेटाळून आयसीआयसीआय बँकेत ठेवी ठेवण्यास मंजुरी दिली. याचबरोबर एयू फायनान्स बँकेत असलेल्या महापालिकेच्या ठेवी काढून त्या राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. शासन आदेश मध्ये एयू बँक समाविष्ट नाही. प्रशासनाने त्यामध्ये ठेवी ठेवण्याचा निर्णय घेतला. तो योग्य नाही. तातडीने राष्ट्रीयकृत बँकेत त्या ठेवी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयामुळे सार्वजनिक निधीच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आल्याची भावना व्यक्त होत असून, सभापती रंजीता चाकोते यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.
शिवसेना गटनेते अमोल शिंदे यांनी
 सभापतीच्या निर्णयाचे केले कौतुक
स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी खाजगी बंधन बँकेचा प्रस्ताव ठेवीसाठी फेटाळला त्या ऐवजी आयसीआयसीआय बँकेत ठेवी ठेवण्यास मान्यता दिली. इतकेच नव्हे तर एयु बँकेतील 14 कोटीच्या ठेवीही राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे असे सांगत सभापती रंजीता चाकोते यांच्या निर्णयाचे कौतुक केले.
Post Views: 44
Previous Post

सातलिंगप्पांच्या सन्मानार्थ मार्केटमधील सौदे पाच दिवस बंद

Next Post

उजनी उजवा व डावा कालव्यासह नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे; भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उजनी उजवा व डावा कालव्यासह नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे; भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण

उजनी उजवा व डावा कालव्यासह नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे; भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण

ताज्या बातम्या

ग्राम सुरक्षा दल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न; भुरट्या चोऱ्या रोखण्यासंदर्भात कारवाई सुरू

August 26, 2026
उमरड येथे हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

उमरड येथे हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

August 26, 2026

ओवाळणीच्या पैशांतून रस्त्यावरील खड्डे बुजविले…! बहिणींच्या प्रेमाची ओवाळणी भावांच्या सुरक्षिततेसाठी

August 26, 2026
वेणगाव पुलाजवळ कार अडवून तरुणावर हल्ला; दगडफेकीने उडवली कारची काच!

वेणगाव पुलाजवळ कार अडवून तरुणावर हल्ला; दगडफेकीने उडवली कारची काच!

August 26, 2026

संतनाथ यात्रेत पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली; ‘छमछम’वर बंदी असूनही ताफे सुरुच

August 26, 2026

सिध्देश्वर साखर कारखान्यात झाला राडा #viral #solapurnews #aajsolapur #news #solapur

August 25, 2026

साखरसाठयाचा धोका नको म्हणून पुरवठा विभागाची धडक कारवाई #solapurnews #viral

August 25, 2026

श्री नीलकंठेश्वर रथोत्सव उत्साहात संपन्न #solapurnews

August 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1119033

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!