अक्कलकोट – बुधवार पेठ येथील श्री विठ्ठल मंदिर येथे अक्कलकोटहून राज्यभरामध्ये अध्यात्माची कास जोडणाऱ्या समर्थनगरी परिवाराच्या वतीने श्री स्वामीनामसाधनावर्गाची (नामस्मरण )सुरुवात गुरुवार रोजी करण्यात आले .
अक्कलकोटहून समर्थनगरी परिवाराच्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे, श्री वे.शा. सं. अण्णू महाराज (स्वामी समर्थ समाधी मठ ) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांच्या नियोजनेनुसार राज्यभरामध्ये एकत्रित नामस्मरण सोहळे घेण्यात येत असतात . या अनुषंगाने अक्कलकोट शहरांमध्ये गुरुवार रोजी श्री स्वामी समर्थ समाधी मठाजवळ बुधवार पेठ येथे श्री विठ्ठल मंदिर मध्ये दर गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत श्री स्वामी समर्थ नाम साधना वर्गाचे शुभारंभ करण्यात आले . यावेळी वेध .शा. सं . अण्णू महाराज , संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे, महिला समिती अध्यक्ष सुखदा ग्रामोपाध्ये, सचिवा अश्विनी शिंपी, निर्मलाताई भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती .
प्रथमतः श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व श्री विठ्ठल – रुक्मिणी माऊलींचे पूजन करून नामस्मरणाचे महत्त्व, नामाची गोडी व स्वामीनामाचा महिमा याबद्दल सर्व भक्तांना मार्गदर्शन करण्यात आले. ओम श्री गुरुवे नमः ,ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करण्यात आले .विश्वशांती व मनशांती करिता सर्वांनी एकत्रित नामस्मरण करून ईश्वराच्या चरणी प्रार्थना केली .
फोटो – नामस्मरण करताना स्वामी भक्त
Post Views: 14