सोलापूर – विभागातील स्थानकांद्वारे पंढरपूर येथे आषाढी मेळा 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंना सोयीस्कर प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वेने आधीच 58 आषाढी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. पंढरपूरमार्गे कर्नाटकातील कलबुर्गी ते महाराष्ट्रातील मिरज दरम्यान 14 जादा गाड्या धावणार आहेत.

ट्रेन क्रमांक 01107 अनारक्षित स्पेशल मिरज येथून 23.7.2026 ते 29.7.2026 पर्यंत दररोज 05.00 वाजता निघेल आणि त्याच दिवशी 13.30 वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. पंढरपूर येथे आगमन/निर्गमन – ०७.४०/०८.४० वाजता होईल तर गाडी क्रमांक 01108 अनारक्षित स्पेशल कलबुर्गी येथून 23.7.2026 ते 29.7.2026 पर्यंत दररोज 15.30 वाजता निघेल आणि त्याच दिवशी 23.50 वाजता मिरजला पोहोचेल. पंढरपूर येथे आगमन/निर्गमन – 20.55/21.00 वाजता पोहोचेल.
आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, धालगाव, जाठ रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट रोड, दुधनी आणि गंगापूर असे या गाड्यांचे थांबे असतील. 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 14 सामान्य द्वितीय श्रेणी असे १४ डब्यांची रचना असेल.




















