सोलापूर : आजच्या 21 व्या शतकात स्पर्धात्मक परिक्षेला अत्यंत महत्व असुन स्पर्धेशिवाय विद्यार्थ्यांना प्रगती करणे अशक्य असल्याने स्पर्धात्मक परिक्षा काळाची गरज झाली आहे असे उद्गार सोलापूरातील थोर विचारवंत व लेखक डॉ.श्रीकांत येळेगांवकर यांनी काढले.
ते कॉ.एन.आर.बेरिया मेमोरियल ट्रस्ट व महानगरपालिका कामगार महासंघा तर्फे कॉ.एन.आर. बेरिया यांच्या स्मृतिदिना निमित्त आयोजित कॅम्प शैक्षणिक परिसरातील सर्व शाळांतील शिष्यवृत्ती परिक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य ई.जा. तांबोळी, प्रा.रियाज वळसंगकर, फैयाज शेख, माजी महापौर ऍ़ड. यु. एन. बेरिया आदी उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणुन बोलताना प्राचार्य ई.जा. तांबोळी यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करुन स्पर्धात्मक परिक्षा उच्चतम पद प्राप्त करण्याचा योग्य मार्ग असुन आजच्या युगात स्पर्धा परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी भाग घेण्याची गरज आहे असे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष ऍ़ड.समीरखान बेरिया यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमास अ.रजाक मकानदार, अल्लाबक्ष मनियार, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन झीनत पटेल यांनी केले. सिद्राम उंबरजे यांनी आभार मानले.
Post Views: 8