सोलापूर – पूर्व भागातील मानाचा ताता गणपती मंडळातर्फे आधारस्तंभ मुरलीधर आरकाल व विश्वस्त उमेश मामड्याल यांच्या मार्गदर्शनाखाली साबळे नेत्र हॉस्पिटल आणि गुजराथी मित्र मंडळ संयुक्त विद्यमाने आशय्या आरकाल यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे बुधवारी 15 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अत्याधुनिक मशीन द्वारे मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि रक्तदान शिबिर संपन्न करण्यात आले आहे, आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचे सत्कार करून सुरवात करण्यात आली,

नगरसेवक अमर पुदाले, मुकेश मेहता, मंडळाचे विश्वस्त सत्यनारायण आरकाल, संदीप कन्ना, अध्यक्ष बालाजी आरकाल व उपाध्यक्ष ॲड संदीप संगा, डॉक्टर राजेंद्र गुल्लापल्ली अशोक इंदापुरे, श्रीनिवास रिकमल्ले लक्ष्मीकांत दंडी तसेच राजेश पातूर, महेश कोंडले, मनोज पातूर,अंबादास अढेली, राकेश पुन्जाल उपस्थित होते
Post Views: 16