बार्शी – शहर पोलीस ठाणे हददीत पंढरपूर आषाढीवारीच्या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबादीत राहावी तसेच वारकरी व नागरिकांचे सुरक्षितेच्या दृष्टीने अवैदय धंदयावर कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे आदेशाने तसेच उपअधीक्षक श्री. विजय कबाडे व बार्शी शहर उपविभागीय अधिकारी श्री. सुहास जगताप व यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी विशेष मोहीम राबवून त्या मोहीम दरम्यान बार्शी शहरातील अवैदय दारु विक्री, जुगार, मटका या अवैदय धंदयावर कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान बार्शी शहरातील एकूण ९ ठिकाणी छापे टाकुन आरोपी रंजना हेमंत भोसले, रा. आगळगाव रोड बार्शी, संजय नागनाथ गव्हाणे रा. ताडसौंदाणे रोड बार्शी
विकास तायाप्पा काळे, रा. वैदय वस्ती बार्शी, सुनिता राजू पवार, रा. ताडसौदाणे रोड, बार्शी, सैफन तालुकदार शेख, रा. मेहंदीनगर बार्शी, विकास अनिल राऊत, रा. कसबा पेठ बार्शी, शुभम बापु केवडकर, रा. सोलापुर रोड बार्शी, लतीफ चाँद सय्यद, रा. आशा टॉकीजजवळ बार्शी, सतीष गोंविद सावळे, रा. सावळ चाळ बार्शी या आरोपींना ताब्यात घेवून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांचे ताब्यातून ९८०५/- रुपयांचा दारु, जुगार, मटका असा मुददेमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस श्री. विजय कबाडे व बार्शी शहर उपविभागीय अधिकारी श्री. सुहास जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, सपोनि सुनिल धनवे, पोसई अभयकुमार माकणे, पोहेकॉ/५१४ भोसले, १०५८ पोफळे, पोहेका ५२० लाड, पोहेको ४२४ गोळवे, पोना १५५८ अडसुळ, पोना १८७३ जाधव पोकॉ/८७३ चौधरी, व सर्व डीबी पथक यांनी केली आहे.
Post Views: 7