सोलापूर – सोलापूरचा पुनर्वैभव आता पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे शिवाय सोलापुरातील दळणवळण व्यवस्था पाहून उद्योजक मोठ्या प्रमाणात येत आहेत हे ऐकून सोलापूर संदर्भात मला खूप समाधान वाटले असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने नाटके अभिनेते संदीप पाठक यांनी केले.
सोलापुरातील एका खास कामाकरिता आलेले प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते संदीप पाठक यांनी बाळे येथील हॉटेल ली मोर ला सदिच्छा भेट दिली. हॉटेलचे एमडी बाबासाहेब भवर, यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते अतुल भवर, सावा संघटनेचे अध्यक्ष संतोष उदगिरी, चौडेश्वरी पतपेढीचे चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पाठक म्हणाले की त्यांचा नुकताच येऊन गेलेला घबाडकुंड हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूपच यशस्वी ठरला. भविष्यात आणखी चांगले सिनेमे ऑफर आहेत तर ते मी नक्कीच करणार आहे अशी त्यांनी मनीषा व्यक्त केली.
प्रस्तावना करताना बाबासाहेब म्हणाले की पुढील पाच वर्षात सोलापुरात आयटी पार्क एमआयडीसी नवीन नवीन सुरू होणार आहेत तर हॉटेलची खूप मोठी गरज भासणार आहे तर भविष्यात लिमोर फाईव्ह स्टार या दर्जामध्ये हॉटेल उभा करणार असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. आभार अमित भवर यांनी मानले.
Post Views: 30