पंढरपूर – पंढरपूर शहर पोलिसांनी आषाढी वारीच्या अनुषंगाने देशी दारू विरुद्ध मोठी कारवाई केल्याची माहिती येथील शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.
या कारवाई संदर्भात माहिती देताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले की, अशोक लेलँड टेम्पो चालक प्रवीण अशोक मोरे (रा.पंढरपूर) याने मंगळवारी (दि.२१) आपले ताब्यातील अशोक लेलँड टेम्पोमध्ये १५५ देशी दारूचे वेगवेगळ्या कंपनीचे बॉक्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानावर खाडाखोड करून कोणत्याही गाडी चालवण्याचे लायसन्स शिवाय बॅच नंबरची नोंद नसताना त्याचप्रमाणे रूट नमूद न करता पालखी मार्गावरून देशी दारूची वाहतूक करताना नाकाबंदी मध्ये मिळून आला.
या वेळी त्याच्या टेम्पो मध्ये सुमारे पाच लाख ५५ हजार २८० रुपये किंमतीचे १५५ बाँक्स तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो असा एकूण दहा लाख ५५ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान अशोक लेलँड गाडीचा चालक प्रवीण अशोक मोरे (रा. पंढरपूर ) यांच्या विरुध्द बी एन एस कलम २२३,२८१ मुंबई दारूबंदी कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रमसिंग मोटे, नितीन जगताप, युवराज पाटील, पंकज गाडेकर, पीएसआय दत्तात्रय लेंडवेपाटील, पोलीस हवालदार सुजित उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र सूर्यवंशी, नवले, ठाकर, पवार, गोडसे, प्रसाद ओटी, सुनील बनसोडे, शहाजी मंडले, चालक पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब बडे यांच्या पथकाने केली.
Post Views: 16