पोदार प्रेप, धाराशिव येथे पालकांसाठी पोर्टफोलिओ मीटचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शिक्षकांनी पालकांशी वन-टू-वन संवाद साधत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास, त्यांची प्रगती, क्षमता, कौशल्ये आणि सर्वांगीण विकास याविषयी सविस्तर माहिती दिली.
शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या पोर्टफोलिओद्वारे त्याच्या शिकण्यातील प्रगती, विविध उपक्रमांमधील सहभाग तसेच भविष्यातील विकासाच्या संधी याविषयी अर्थपूर्ण मार्गदर्शन केले. शिक्षकांनी दिलेल्या तपशीलवार आणि समर्पक माहितीमुळे पालकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिवचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर यांनी पालक व शिक्षक यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यास पालकांना मदत होत असून शाळा व पालक यांच्यातील नाते अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ॲडमिन ऑफिसर जीवन कुलकर्णी सर यांनीही पालकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि शाळा-पालक यांचे सहकार्य विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
तसेच पोदार प्रेप, धाराशिवच्या मुख्याध्यापिका रेश्मा संकपाळ मॅडम यांनी सांगितले की, अशा उपक्रमांना पालकांचा लाभत असलेला सकारात्मक प्रतिसाद व उत्साह आम्हाला अधिक जोमाने कार्य करण्यास प्रोत्साहित करतो. आपल्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच आमची शैक्षणिक वाटचाल अधिक समृद्ध होत आहे, असे सांगून त्यांनी उपस्थित पालकांचे आभार मानले.
Post Views: 19