मुंबई – दिनांक ३० जुन २०२५ रोजीच्या, मुंबईतील एस.सी. उपवर्गीकरण विरोधी प्रचंड संख्येने शांततेत पार पडलेल्या महामोर्चानंतर व त्यादिवशी व दुस-या दिवशी महाराष्ट्र राज्य विधानसभा अधिवेशनात एस.सी. राखीव मतदार संघातून निवडूण आलेल्या आमदारांच्या सरकारला निवेदणानंतर व राज्यविधानसभेत अनेक विधानसभा सदस्यांच्या प्रश्नांवर सरकारची बाजू मांडताना मुख्यमंत्री फडणविस यांनी केलेल्या निवेदणात अजून सरकारने याबाबतीत ठोस निर्णय घेतलेला नाही व याबाबत सरकार सर्व संबंधितांबरोबर चर्चा करून निर्णय घेईल अशा निवेदणानंतरही सरकारने राज्यात गोंधळाची परिस्थीती निर्माण केलेली असून उपवर्गीकरण रद्द होणार की नाही याबाबत संदिग्धता निर्माण केल्यामुळेच एस.सी. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती-महाराष्ट्र तर्फे संपूर्ण राज्यभरात जिल्हावार उपवर्गीकरणविरोधी विशाल मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्धार केला असून जवळपास १५ जिल्हयात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हावार मोर्चे खालील प्रमाणेः-
१) २१ जुलै- जालना,
२) २७ जुलै सोलापूर,
३) २८ जुलै- धाराशिव
४) २९ जुलै- बुलढाणा,
५) ८ ऑगष्ट पूणे,
६) ९ ऑगष्ट- नांदेड
७) १० ऑगष्ट-परळी,
८) ११ ऑगष्ट अंबेजोगाई,
९) २२ ऑगष्ट-नाशिक
उपरोक्त मोर्चेव्यतिरिक्त राज्यभरात अनुसूचित जाती आरक्षण संवाद परिषदांचे आयोजन केले जाणार असून एवढे झाल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने एस.सी. उपवर्गीकरण निर्णय जर रद्द केला नाही तर हे आंदोलने तिव्र केले जाईल व त्यांची सुरूवात महाराष्ट्र बंदने करावी लागेल याची सरकारने गंभीर दखल घ्यावी व आरक्षण धोरण पूर्णपणे न राबविता, पदोन्नती धोरणे न राबविता, राज्यात नोकर भरती न करता सरकारने हे नसते उठाठेव करू नये अशी सरकारला विनंती आहे.
आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती दिल्लीत, महाराष्ट्रात व इतर राज्यात होत असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करते व विविध राज्यातील पोलिसांव्दारे विद्यार्थ्यांवर, अमानुष, लाठी हल्ला करणा-या केंद्र व राज्य सरकारचा तीव्र निधेष करते या शिवाय या समितीतर्फे आजच्या महाराष्ट्र बंद मध्ये देखील सहभागी होवून समर्थन दिलेले आहे.
विनित
आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती-महाराष्ट्र
१) मा. आनंदराज आंबेडकर (अध्यक्ष- रिपब्लिकन सेना)
२). अॅड. डॉ. सुरेश माने (अध्यक्ष- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी)
३) मा. बाबूराव माने (माजी आमदार)
४) मा. भिमराव आंबेडकर (भारतीय बौध्द महासभा)
५) मा. बबनराव घोलप (माजी मंत्री महाराष्ट्र)
६) मा. राजकुमार बडोले (माजी मंत्री महाराष्ट्र)
७) मा. संजय खामकर (अध्यक्ष-चर्मकार विकास संघ)
८) मा. प्रा. संदेश वाघ (समन्वयक)





















