अक्कलकोट – बादोले ब्रु येथील शेतकरी संजय नरसिंग धायगोडे या शेत कऱ्याचे चार एकर को २६५ वाणाच ऊस डिपी मधुन जाणारे एल टी वायर स्पार्क होऊन ठिणगी पडून ऊसाच्या फडाला आग लागल्या ने जळून खाक झाले . पाऊसा अभावी प्रचंड दुष्काळ असल्याने मोठ्या कष्ठाने जागविलेले ऊस विज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे ऊस जळाल्या चा आरोप शेतकरी संजय धायगोडे यांनी केला असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी व्यक्त केली आहे .
यंदा खरीप हंगाम तसेच आता रब्बी हंगाम पावसाअभावी पुर्ण पणे नष्ठ झाला आहे . अनेक शेत कऱ्यानी मोठे कष्ठ आर्थिक झळ सोसून कसे बसे चार एकर ऊस जगविले . आस्मानी संकट शेतकऱ्या वर कोसळले असता ना वीज वितरण कंपनी चे सुलतानी संकटाने ४ एकर ऊस डोळ्यादेखत जळून जात असल्याने पाहून शेतकरी अक्षर क्ष : उध्वस्त झाला . दुष्काळाच्या प्रचंड यातना भोगता ना शेतकऱ्यावर संकटावर संकटे येत असल्याने मायबाप सरकारने शेतकऱ्याना सहानुभुतीने मदत करावी अशी मागणी व्यक्त होत आहे .