Tuesday, October 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वारकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘भव्य वारकरी महाअधिवेशन’ !

तरुण भारतbyतरुण भारत
July 23, 2026
in solapur
0
वारकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘भव्य वारकरी महाअधिवेशन’ !
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

      सोलापूर – वारकरी संप्रदाय गेली अनेक शतके समाजाला नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण आणि देशभक्तीची शिकवण देत आहे. आजही हा संप्रदाय धर्म आणि राष्ट्रहितासाठी अविरत कार्यरत आहे. याच भूमिकेतून वारकरी ऐक्य साधण्यासाठी आणि शासनाकडे महत्त्वपूर्ण मागण्या लावून धरण्यासाठी आषाढी एकादशीच्या (२५ जुलै) पावन पर्वावर पंढरपूर येथे एक दिवसीय भव्य ‘वारकरी महाअधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. पंढरपूर, आळंदी येथे वर्ष २००८ पासून अशा प्रकारची अधिवेशन चालू असून या महाअधिवेशनात हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या ह.भ.प. आणि पूजनीय संतांना ‘घुसखोर’ संबोधून त्यांचा अवमान करणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांचा जाहीर निषेध करण्यात येईल. तसेच, धर्मरक्षणासाठी झटणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संतांचा या वेळी जाहीर सन्मान करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज तुनतुने (शास्त्री), राष्ट्रीय प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.

     हे महाअधिवेशन दिनांक २५ जुलै २०२६ (आषाढी एकादशी) दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत पंढरपूर येथील भक्तीमार्ग, जनकल्याण हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठात पार पडेल. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान आचार्य पूज्यपाद श्री १००८ दंडी स्वामी अमृताश्रम महाराज भूषवणार असून, सरला बेट, श्री क्षेत्र गोदावरी धामचे पीठाधीश महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांचे मार्गदर्शन या अधिवेशनाला लाभणार आहे.

         या अधिवेशनात ज्येष्ठ कीर्तनकार संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वरशास्त्री महाराज आणि सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, श्री विठ्ठल–रुक्मिणी संस्थानचे (पंढरपूर) विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी) चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज मार्गदर्शन करतील. तसेच, शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्री. अक्षय महाराज भोसले, भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशप्रमुख श्री. तुषार भोसले, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. मारुती महाराज तुनतुने, ह.भ.प. बापू महाराज रावकर, ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांसह अनेक मान्यवर संत, महंत, धर्माचार्य आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुखही आपले विचार मांडणार आहेत.

           या अधिवेशनात वारकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांसमुक्त करावीत तसेच या तीर्थक्षेत्रांच्या 10 किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर सक्त बंदी आणावी, ही प्रमुख मागणी असेल. याशिवाय, संत–वाङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म आणि देवतांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र ’ईशनिंदा प्रतिबंधक कायदा’ लागू करावा आणि संतांच्या श्लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्‍यांना शासनाने कायमचा प्रतिबंध करावा. नक्षलवाद्यांचे समर्थन करणार्‍या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’सारख्या संघटनांना तसेच नास्तिक अन् पुरोगाम्यांना वारीत येण्यास प्रतिबंध करावा आणि ‘अंनिस’च्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीसाठी तात्काळ प्रशासक नेमावा. वारकरी शिक्षण संस्था आणि वेद पाठशाळांना मासिक अनुदान द्यावे, चंद्रभागा व इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण त्वरित रोखावे आणि ‘वक्फ बोर्डा’ने हडपलेल्या मंदिरांच्या जमिनी परत मिळवण्यासाठी शासनाने त्वरित निर्देश द्यावेत, अशा महत्त्वपूर्ण मागण्या या वेळी शासनाकडे केल्या जातील.

         तसेच, पुरातत्त्व विभागाच्या श्री विठ्ठल–रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनाच्या धर्मविरोधी निर्णयाविरुद्ध वारकरी अन् मंदिर महासंघ यांनी दिलेल्या लढ्याबाबत या महाअधिवेशनात चर्चा केली जाईल. प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’ कायमस्वरूपी रद्द करून देवभूमीचे रक्षण करणारा ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ लागू झाला पाहिजे, असा महत्त्वाचा ठरावही मांडण्यात येईल. समस्त वारकरी आणि भाविकांनी या ऐतिहासिक अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले असून अधिक माहितीसाठी श्री. विनोद रसाळ (संपर्क: ९९७५५९२८९२) यांच्याशी संपर्क साधावा.

Post Views: 97
Previous Post

कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील २१ शेतकरी 

Next Post

फोर्स मोटर्सने नवीन ‘अर्बानिया डिलक्स’ लॉन्च केली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
फोर्स मोटर्सने नवीन ‘अर्बानिया डिलक्स’ लॉन्च केली

फोर्स मोटर्सने नवीन 'अर्बानिया डिलक्स' लॉन्च केली

ताज्या बातम्या

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 27, 2026

शिवस्मारकतर्फे किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन…सहभागी होण्याचे सोलापूरकरांना आवाहन…

October 27, 2026

पाण्याच्या नासाडी बाबत सामान्य कार्यकर्त्याने दाखवला आयुक्तांनाच आरसा

October 27, 2026

तुम्हाला जनतेचा खूप कळवळा ते जनता चांगलं जाणते – आ. कल्याणशेट्टी

October 27, 2026

आता बोलावं लागेल काँग्रेस देशाला अस्थिर करतेय.. पालकमंत्री गोरे..

October 27, 2026

खरगेंनी बापाला ललकारलं, मोदींचा VIDEO तुफान व्हायरल!

October 27, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 27, 2026

आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांना सोलापूर महानगरपालिकेचे अभिवादन

October 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1424348

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!