Thursday, July 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

फोर्स मोटर्सने नवीन ‘अर्बानिया डिलक्स’ लॉन्च केली

तरुण भारतbyतरुण भारत
July 23, 2026
in mumbai
0
फोर्स मोटर्सने नवीन ‘अर्बानिया डिलक्स’ लॉन्च केली
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : फोर्स मोटर्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या व्हॅन उत्पादक आणि अग्रगण्य ऑटोमोटिव्‍ह उत्पादक कंपनीने आज नवीन अर्बानिया डिलक्स लाँच केली. ही वेईकल तिच्‍या नेक्स्ट-जनरेशन शेअर्ड मोबिलिटी प्लॅटफॉर्मची नवीन प्रीमियम उत्पादन श्रेणी आहे. अर्बानिया प्लॅटफॉर्मच्या यशावर आधारित नवीन अर्बानिया डिलक्स अधिक उत्कृष्ट प्रीमियम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, ज्यामध्ये प्रवाशांची सोय केंद्रस्थानी ठेवून सुधारित कामगिरी, प्रीमियम इंटीरिअर्स आणि प्रगत तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. या लाँचसह, नवीन अर्बानिया डिलक्स सध्याच्या पिढीतील अर्बानियाची जागा घेईल आणि प्रीमियम शेअर्ड मोबिलिटी क्षेत्रात फोर्स मोटर्सचे मानक उत्पादन बनेल.

फोर्स मोटर्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, “अर्बानियाच्या माध्यमातून आम्ही भारतातील प्रीमियम सामायिक प्रवासी वाहतुकीला नव्‍या उंचीवर नेले आणि संपूर्ण नवीन क्षेत्र निर्माण केले, ज्याला भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. या यशामधून उत्तम सोय, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे संयोजन असलेल्या वेईकल्सना मिळणारी वाढती पसंती दिसून येते. नवीन अर्बानिया डिलक्सच्या लाँचसह आम्ही ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि प्रवाशांच्या मागणीनुसार उत्तम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म सुधारित कार्यक्षमता, प्रीमियम वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञानासह नवीन स्तरावर घेऊन जात आहोत. प्रीमियम मोबिलिटी क्षेत्र सातत्याने विकसित होत असताना आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि प्रवाशांची सोय, सुरक्षितता व कामगिरी यामध्ये नवीन मावदंड निर्माण करणारे मोबिलिटी सोल्यूशन्स देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

भारतातील पहिले पूर्णपणे पायाभूत मोड्यूलर मोनोकॉक व्हॅन प्लॅटफॉर्म म्हणून लाँच केलेल्या अर्बानियाने प्रीमियम सामायिक प्रवासी वाहतुकीमध्ये नवीन मापदंड निर्माण केला, भारतातील बाजारपेठेत नवीन क्षेत्र स्थापन केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपली खास ओळख निर्माण केली. या वारशाचा विस्तार करत, नवीन अर्बानिया डिलक्स अनेक सुधारणा सादर करते, ज्या प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी तसेच प्रीमियम शेअर्ड मोबिलिटी क्षेत्रातील ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

नवीन अर्बानिया डिलक्सला अधिक शक्तिशाली मर्सिडीज-आधारित २.६-लीटर, फोर-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिनची ताकद देण्यात आली आहे, जे १०० किलोवॅट (१३४ एचपी) ताकद आणि ३५० एनएम टॉर्क प्रदान करते. यामुळे सुधारित पिकअप, सुलभ कामगिरी आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. केबिनला नवीन प्रीमियम इंटीरिअर थीमसह व्यापकपणे अपग्रेड करण्‍यात आले आहे, ज्यामध्ये लेदरेट सीट्स, मॅचिंग अपहोल्स्ट्री आणि आकर्षक वूड-फिनिश फ्लोअरिंगचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांच्या उत्तम सोयीसह उत्कृष्ट प्रवास वातावरण तयार होते.

नवीन अर्बानिया डिलक्समध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे, प्रत्येक प्रवाशासाठी कारसारखे ३-पॉइंट सीट बेल्ट्स दिले आहेत. यासोबत ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हर एअरबॅग्ज, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी) आणि इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल (ईटीडीसी) यांचा समावेश आहे, जे प्रवाशांना अधिक सुरक्षिततेची खात्री देतात.

ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक उत्‍साहवर्धक करण्यासाठी वेईकलची रिअल-टाइम माहिती देणारे टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ऑनलाइन व ऑफलाइन नेव्हिगेशन, एचडी रिव्हर्स कॅमेरा, व्हॉइस अलर्ट्स व हँड्स-फ्री ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा असलेली कस्टमाइज्ड २३ सेमी (९-इंच) एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे.

नवीन १६-इंच अलॉय व्हील्स नवीन अर्बानिया डिलक्सला रस्त्यावर प्रीमियम लूक देतात, तर पॉवरवर चालणारी स्लायडिंग फूटस्टेप प्रवाशांना सहजपणे आत येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी मदत करते. प्रवासाचा प्रीमियम अनुभव पुढे नेण्यासाठी यात ८-स्पीकर डिजिटल थिएटर सिस्टम (डीटीएस) आणि सर्व सीट्सच्या रांगेत स्मार्टफोन सहज चार्ज करण्यासाठी इल्यूमिनेटेड यूएसबी टाइप-ए आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट्स आहेत.

नवीन अर्बानिया डिलक्सला फोर्स केअरचे पाठबळ आहे, ज्यामध्ये फोर्स मोटर्सचे प्रगत आय-पल्स टेलिमॅटिक्स प्लॅटफॉर्म, ५ वर्षे किंवा ५ लाख किमी वॉरंटी, सर्व सेन्सर्सवर ३ वर्षांची वॉरंटी आणि ३ वर्षांची रोडसाइड असिस्टन्स (आरएसए) सुविधा समाविष्ट आहे, जी मालकीच्या संपूर्ण अनुभवादरम्यान मन:शांतीची खात्री देते.

नवीन अर्बानिया डिलक्स तीन व्हीलबेसेस आणि ९+डी ते १६+डी सीटींग कॉन्फिग्युरेशन्ससह आठ सीटींग लेआउट्समध्ये संपूर्ण भारतातील फोर्स मोटर्सच्या डीलर नेटवर्कद्वारे उपलब्ध असेल. या वेईकलची सुरुवातीची किंमत २८.७० लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Post Views: 15
Previous Post

वारकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘भव्य वारकरी महाअधिवेशन’ !

Next Post

कर्जमाफीचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार- जिल्हा उपनिबंधक मुकूंद पवार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कर्जमाफीचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार- जिल्हा उपनिबंधक मुकूंद पवार

कर्जमाफीचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार- जिल्हा उपनिबंधक मुकूंद पवार

ताज्या बातम्या

सोलापूरच्या यश बोरामणी व समर्थ दोरनाल यांची महाराष्ट्र संभाव्य क्रिकेट संघात निवड

सोलापूरच्या यश बोरामणी व समर्थ दोरनाल यांची महाराष्ट्र संभाव्य क्रिकेट संघात निवड

July 23, 2026

दिल्ली येथील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ माढा बंद

July 23, 2026

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

July 23, 2026
आषाढीसाठी सजली पंढरीतील प्रासादिक साहित्याची दुकाने

आषाढीसाठी सजली पंढरीतील प्रासादिक साहित्याची दुकाने

July 23, 2026

संतांचे पालखी सोहळे वाखरी मध्ये शेवटच्या मुक्कामासाठी गुरुवारी झाले दाखल

July 23, 2026
ग्लोबल दिंडी मध्ये श्वानाचाही सहभाग, मुक्या प्राण्यांनाही श्री विठ्ठलाची ओढ

ग्लोबल दिंडी मध्ये श्वानाचाही सहभाग, मुक्या प्राण्यांनाही श्री विठ्ठलाची ओढ

July 23, 2026
आषाढी यात्रेत ढोलक्यांना मागणी, ढोलकी विक्रीसाठी खास उत्तरप्रदेशातून कारगीर पंढरीत दाखल

आषाढी यात्रेत ढोलक्यांना मागणी, ढोलकी विक्रीसाठी खास उत्तरप्रदेशातून कारगीर पंढरीत दाखल

July 23, 2026
मंगळवेढ्यात कॉलेज परिसरात मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओंवर पोलीसांची कारवाई

मंगळवेढ्यात कॉलेज परिसरात मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओंवर पोलीसांची कारवाई

July 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0994204

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!