माढा : देशातील नीट पेपर फुटी प्रकरण व त्या परीक्षेच्या गैरप्रकाराच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व नीट पेपर गैरप्रकाराच्या संबंधितावर चौकशी करून कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोनम वांगचुक व कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके हे दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावरती आंदोलनाला बसले आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत. त्यादरम्यान त्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे पोलिसांकडून लाठी चार्ज केला जात असल्याचे व त्यांच्यावर अन्याय होत असल्याने बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवार २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या अनुषंगाने माढ्यात सकाळपासूनच कडकडीत बंद पाळून दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला गेल्याचे दिसून आले. यावेळी माढा शहरातील बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते विद्यार्थी व नागरिकांनी माढा तहसील कार्यालयात जाऊन दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी चार्जचा निषेध व्यक्त करत निवेदन दिले आहे. त्या निवेदनात असे म्हटले आहे की नीट परीक्षा संदर्भातील कथित पेपरफुटी व इतर अनियमिततांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीमाराचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत. विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने आपल्या न्याय मागण्या मांडत असताना त्यांच्यावर बळाचा वापर करणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यानुसार माढा शहरातही शांततापूर्ण पद्धतीने बंद पाळण्यात येत आहे. दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीमाराची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे म्हटले आहे. हे निवेदन देताना सुधीर लंकेश्वर,गणेश मोरे,किरण पवार, प्रविण पवार, अतिश लंकेश्वर,अभिजीत पवार, प्रमोद भोळ, किरण बा. पवार, फारूख शेख,आकाश सरतापे, राजाभाऊ खंडागळे. इत्यादी कार्यकर्ते नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 35