पिलीव – माळशिरस तालुक्यासह पिलीव परिसरात यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्यामुळे बळीराजा चांगलाच चिंतेत आहे. जुन महीन्यात झालेल्या थोड्याफार पावसावर अजुन पुढे चांगला पाऊस होईल या अपेक्षेने बचेरी, शिंगोर्णी, सुळेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी बाजरी, मका ,कडवळ ह्या पिकांची पेरणी केली पण या भागात अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस पडलाच नाही.सध्या तर पावसाने चांगलीच ओढ दिल्यामुळे ही पेरलेली पिके जळुन जाण्याची धास्ती लागली आहे.सध्या पावसाने या भागात चांगलीच ओढ दिली आहे.तर सध्या धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्यामुळे निरा _ उजवा कॅनाॅलला पाणी आले आहे.पण अद्यापपर्यंत या भागातील फाटयांना पाणी सोडलेच नाही .यामुळे या भागातील कॅनाॅलखालील भागातील पिके सुद्धा अडचणीत आहेत. यंदा म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे.यंदा सोमवारी बेंदुर सण साजरा करण्यात येणार आहे.पण यंदाच्या या सणावर दुष्काळाचे सावट दिसत असुन जनावरांना सजविणयासाठी आवश्यक असणारे साहीत्य घेण्यासाठी पिलीव बाजारपेठेत अद्यापही गर्दी पाहावयास मिळत नाही.दुष्काळामुळे निरुत्साह दिसत आहे.पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरीही अद्याप म्हणावा तसा पाऊसच पडला नाही. यामुळे हा भागाची सध्या दुष्काळाकडे वाटचाल सुरु आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















