मंगळवेढा – तालुक्यात विशेषत: ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये ड्राय डे दिवशीच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री फोफावत असल्याचे दिसून येत आहे. तरी याबाबत वरिष्ठ दारूबंदी अधिकार्यांनी विशेष पथकाकडून ठोस कारवाई करावी अशी मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे.
दिवसेंदिवस अवैध व्यवसाय फोफावत आहेत. आज शनिवार 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीनिमित्त मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे (Dry Day) पाळला जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दारूची दुकाने, बार, पब आणि मद्यविक्रीचा परवाना असलेली आस्थापने दिवसभर बंद राहणार असा आदेश काढलेला आहे.
आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील तर संपूर्ण जगातील एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. या दिवशी लाखो भाविक भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. राज्यभरातील मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि विशेष पूजा आयोजित केल्या जातात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दरवर्षी या दिवशी मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
मात्र प्रत्यक्षात अशा या ड्राय डे दिवशीच दामाजी नगर व चोखामेळा नगर या ग्रामपंचायत हद्दीमध्ये बेकायदेशीर बनावट दारूची जादा भावाने आणि चढ्या दराने विक्री होत असल्याचे दिसून आले आहे.
दारूबंदीचे अधिकारी तालुक्यातील आमदारांच्या आदेश सुद्धा पाळत नाहीत. तालुक्यातील दामाजी नगर व चोखामेळा नगरीतील हॉटेल व्यवसायिकाकडून तर मद्यपी लोकांना आमंत्रण दिल्याप्रमाणे या भागातील हॉटेलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होते. या ठिकाणांच्या हॉटेलमध्ये सुद्धा ड्राय डे दिवशी दारू आणि पार्टीसाठी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स न पाळता येथून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे देशी, विदेशी आणि सर्व कंपन्यांच्या दारूसह बियरची अगदी राजरोसपणे विक्री सुरू असते. येथे बेकायदेशीर दारूची विक्री होत आहे. तरी याबाबत वरिष्ठ दारूबंदी अधिकाऱ्यांनी चौकशी करून विशेष पथकाकडून धाड टाकावी आणि ठोस कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Post Views: 14