अक्कलकोट – ही माझी जन्मभूमी असल्याचा मला अभिमान आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात होत आहे . वारी मध्ये राज्यघटनेतील समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये वारकरी परंपरेतही अनुभवायला मिळतात. केवळ भव्य इमारत उभारणे हा उद्देश नसून, येथे उच्च दर्जाची न्यायव्यवस्था निर्माण होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी न्यायाधीश, वकील आणि कर्मचारी सक्षमपणे कार्य करतील, असा विश्वास मुंबई उच्य न्यायालयाचे सन्मानिय न्यायमुर्ती एन जे जमादार यांनी व्यक्त केला.
अक्कलकोट येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक व सर्वसुविधांनी सुसज्ज नवीन न्यायालयीन इमारतीची कोनशिला सभारंभ शनिवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या हस्ते झाला यावेळी न्यायमुर्ती जमादार बोलत होते . . यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फिरदोस पुनीवाला आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा (सोलापूर)
न्यायमूर्ती एम.एम. कल्याणकर, बार असोसिएशनचे सदस्य मिलिंद थोबडे, अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्यासह न्यायमूर्ती आर. ए. कटारे, आदिची प्रमुख उपस्थिती होती
न्यायदान प्रक्रिया सक्षम होईल
न्यायमूर्ती फिरदोस पुनीवाला यांनी नव्या इमारतीमुळे आधुनिक सुविधा उपलब्ध होऊन न्यायदान प्रक्रिया अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे यांनी सोलापूर व बार्शी येथील न्यायालयीन इमारतीची कामेही वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा केली. न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास दृढ करण्यासाठी वेळेत न्यायनिवाडा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी न्यायमूर्ती एन.एल. शेख, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ॲड. अनिल मगरुळे, ॲड. विजय हर्डिकर, ॲड. शरद फुटाणे, ॲड. उमाकांत पायमल्ले, पी. आर. शहा, ॲड. अश्विनी बाग, ॲड. एखंडे, तहसीलदार विनायक मगर, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, कार्यकारी अभियंता दिनेशसिंह परदेशी, उपअभियंता श्रीनिवास बासुतकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक पवार, सपोनि प्रशांत बदे सादिक आत्तार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद तालुकाध्यक्ष नंदकुमार जगदाळे डिजीटल मिडीया सोलापुर लोकसभा अध्यक्ष राजेश जगताप अरविंद पाटील प्रशांत गुरव वसंत देडे जानकर राजेश जाधव, धायगोडे ,लोके ,मिलिंद साळुंखे लोकापुरे अंजली शाबादे भोसले मॅडम श्रीशैल गंवडी शिंदे विविध विभागाचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत गीत सादर करण्यात आले. प्रास्ताविक व्ही. एन. पाटील यांनी केली. अक्कलकोट बार असोसिएशनच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार न्यायमूर्ती एम.एम. कल्याणकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चौकट
न्यायदान प्रक्रिया सक्षम होईल
न्यायमूर्ती फिरदोस पुनीवाला यांनी नव्या इमारतीमुळे आधुनिक सुविधा उपलब्ध होऊन न्यायदान प्रक्रिया अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे यांनी सोलापूर व बार्शी येथील न्यायालयीन इमारतीची कामेही वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा केली. न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास दृढ करण्यासाठी वेळेत न्यायनिवाडा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
Post Views: 8