करकंब – करकंब ता.पंढरपूर येथील रामभाऊ जोशी हायस्कूल व डी.एव्ही.महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी पवन बालाजी धायगुडे याने लखनऊ येथे पार पडलेल्या ६५ किलो वजन गटांमध्ये अंतिम सामन्यात राजस्थानचा पैलवान सागर यास ६-२ अशा गुणांनी पराभूत करून सुवर्णपदक पटकावून देशात प्रथम क्रमांक मिळवला.तसेच कॉमनवेल्थ २०२६ साठी त्याची निवड झाली आहे.यापूर्वी पैलवान पवन याने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता,मागील जून महिन्यात थायलंड येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती त्यामध्ये त्याने ५वा क्रमांक मिळवला होता.त्याची दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या १७ वर्षाखालील कॉमनवेल्थ गेम्समध्ये निवड झाली आहे.करकंब सारख्या ग्रामीण भागातील पवनने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले हे यश रामभाऊ जोशी हायस्कूलसाठी व डी.ए.व्ही महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्युनिअर कॉलेज करकंब साठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मुख्याध्यापक हेमंत कदम यांनी सांगितले.पवनला अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार छत्रपती पुरस्कार विजेते शरद पवार,गोविंद पवार,अमोल यादव (एसयेआय) त्याचे वडील बालाजी धायगुडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या ऐतिहासिक यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्था, सोलापूरचे स्थानिक सचिव महेश चौप्रा,प्रशासकीय अधिकारी डॉ.विजयकुमार उबाळे,प्रशालेचे मुख्याध्यापक तथा क्रीडाशिक्षक हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत करळे,शैक्षणिक सल्लागार समिती सदस्य,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पवनचे अभिनंदन केले.
Views: 11