मोडनिंब – मोडनिंब (ता. माढा) येथे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित ३१ व्या वैष्णव मेळाव्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या मेळाव्यात हरिपाठ, हरिकीर्तन, उद्घाटनपर कीर्तन, चक्रीकीर्तन, चिंतन शिबिर, दिंडी सोहळा (ग्रामप्रदक्षिणा), काल्याचे कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.मेळाव्यात ह.भ.प. महेश पाटील (जळगाव), ह.भ.प. धनश्रीताई शिंदे (जळगाव), ह.भ.प. नामदेव अप्पा बिलाडे (अहिल्यानगर) आणि ह.भ.प. सौ. विजयाताई पंडित (श्रीगोंदा-पेडगाव) यांच्या सुश्राव्य कीर्तनांनी उपस्थित भाविकांना भक्तिरसाचा आनंद दिला.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























