श्रीपूर मध्ये भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश शिन्दे एस आर आय चा आढावा घेण्यासाठी आले असता राहूल रेडे – पाटील यांनी ही मागणी केली .
या प्रसंगी नगरसेवक रावसाहेब सावंत – पाटील, निनाद पटवर्धन, प्रा . प्रकाश नवगिरे,शिवाजी रेडे – पाटील, बापूराव रेडे – पाटील, विक्रमसिह लाटे, जगदीश इंगळे, मौला पठाण , रमेश देवकर, उपस्थित होते .
प्रथम निनाद पटवर्धन यांनी प्रास्ताविकात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही एस आय आर मध्ये प्रत्येकाचे नाव नोंदण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगून लवकरच महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होईल त्यासाठी संघटन मजबूत होणे गरजेचे असल्याचे सांगितले .
तर महेश शिन्दे यांनी एसआयआर चे महत्व सांगताना आता फक्त एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असून त्वरीत राहीलेली नोंदणी करावी अन्यथा शासकीय योजना पासून दूर राहावे लागेल असे सांगून महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीचे निवडणुकी बाबत प्रथम आपण बुथ ची रचना करुन त्यावर काम करणाऱ्यां कार्यकर्त्यांची नावे पाठवावीत त्यानंतरच पक्षीय बांधणी करु असे सांगितले .
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – — विरोधकांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन बिघडवले – –























