बार्शी – लायन्स क्लब बार्शी रॉयल यांच्यावतीने वखारिया विद्यालयमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्यात आली. हे शिबीर ३० जुलै रोजी घेण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे उपव्यवस्थापक श्री. उदय रमावत तसेच त्यांच्यासोबत ज्योतीराम पवार यांच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले. यात ३४ विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्यात आली. मुलांना बचतीचे महत्त्व कळावे व बचतीची सवय लागावी. तसेच बँकिंगशी परिचय करुन देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुलांची बँक खाती उघडण्यात आली. त्यावेळी सेक्रेटरी ला. दयानंद रेवडकर उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी यश पवार व रुक सारा बागवान तसेच विकास बुरगुटे यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 28