सोलापूर : पाण्याच्या आडात पडून एका सात वर्षीय चिमुकल्याचा दुदैवी अंत झाला. ही घटना कारंबा (ता. उ. सोलापूर) येथे ३१ जुलै राेजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद सोलापूर तालुका पेालिस ठाण्यात झाली आहे.
बाबु तानाजी होळकर (वय ७, रा. कारंबा, ता.उ.साेलापूर) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ३१ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मयत बाबु हा घरासमोर आपल्या मित्रासमवेत खेळत होता. खेळता खेळता घरासमोरील पाण्याच्या आडात तो पडला. त्याला १५ मिनिटानंतर बाहेर काढून उपचारासाठी सोलापूर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला जबर मार, नाक, तोंडावाटे रक्त येत असल्याने तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शनिवारी शवविच्छेदनानंतर त्याच्यावर कारंबा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची माहिती डॉ. तुषार मधुकर निंबोरे यानी पोलिसांना दिली. या घटनेची नोंद सोलापूर तालुका पेालिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सलीम पिरजादे हे करीत आहेत.
Post Views: 9