सोलापूर – देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूर या संस्थेचा ९५ वा वर्धापन दिन संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने संस्थेच्या सभागृहात असलेल्या समर्थ रामदास स्वामी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस पुष्पांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी १९३१ साली संस्था स्थापन झाली तेव्हापासून ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करणारी संस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक आहे. ही संस्था केवळ ब्राह्मण समाजासाठी कार्य न करता समाजातील सर्व घटकासाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवून संस्थेने आपले कार्य सर्व दूर पोहोचविले आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता आराध्ये यांनी आणखीन पाच वर्षांनी संस्थेचा शताब्दी महोत्सव येत आहे त्या दृष्टीने सर्व सभासदांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आत्तापासून शतक महोत्सवाच्या निमित्ताने सभासद वाढविण्यासह विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. संस्थेचे कार्यवाह श्याम जोशी यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील काळात संस्थेतर्फे रबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांनी युवकांच्या सहभागासाठी युवक सभासद वाढविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महिला अध्यक्षा हेमा चिंचोलकर यांनी महिलांचे संघटन होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, कार्यकारणी सदस्य प्रदीप जोशी, रवींद्र तुळजापूरकर, रंगनाथ जोशी यांच्यासह मंगलाताई चिंचोळकर डॉ. अजित कुमार देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र नाशिककर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कोषाध्यक्ष सतीश पाटील, नितीन कवठेकर, मंगेश महाजन, श्रीकांत तुळजापूरकर, सुनील हरहरे, अक्षय पाटील, संजय कुलकर्णी, क्षितिजा गाताडे, शुभदा कुलकर्णी, रविंद्र नाशिककर आदींसह अनेक सदस्य उपस्थित होते.
चौकट………..
यावेळी महिला शाखेच्या सदस्यांनी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेस ३ हजार रुपयांची देणगी दिली. महिला शाखेच्या अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर यांनी ही देणगी अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर आणि कोषाध्यक्ष सतीश पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
Post Views: 8