पिलीव – महाराष्ट्रात सध्या भाजपा _ शिवसेना शिंदे गट _ राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) यांचे महायुतीचे सरकार सत्तेत आहे.सोलापूर जिल्ह्य़ातही सध्या भाजपचे सर्व ठिकाणी म्हणजे जिल्ह्य परिषद, महानगरपालिकेत बहुमतातील वर्चस्व आहे.सोलापूर जिल्ह्य़ाचे पालकमंञी म्हणुन जयकुमार गोरे यांनी पदभार स्वीकारुन जवळपास दीड वर्षाचा कालावधी झाला आहे.इतर सर्व निवडणुका झाल्या आहेत. फक्त आता निवडणुकीत संधी न मिळालेल्या कार्यकर्ते तसेच तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी यांना आपली सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे .यासाठी ते आपल्या गाॅडफादर मार्फत फिल्डिंग लावुन आहेत .पण निवडी कधी होणार हे निश्चित नाही.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकास कामे व्हावीत म्हणून या निवडी केल्या जातात. सोलापूर जिल्ह्य़ात अश्या केल्या जातात निवडी _ सोलापूर जिल्ह्यातील 68 जिल्ह्य परिषद समस्यांमधून 27 सदस्याची निवड केली जाते,तर महानगरपालिकेतील 102 नगरसेवकामधुन 9 सदस्यांची निवड केली जाते तर तर सदस्य नगरपालिका क्षेत्रातुन अश्या एकुण 40 सदस्यांची निवड केली जाते .तर जिल्ह्य नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंञी तर सचिव जिल्ह्य अधिकारी असतात . खासदार, आमदार विशेष निमंत्रित सदस्य _ या जिल्ह्य नियोजन समीतीचे विद्यमान आमदार, खासदार व विशेष निमंत्रित सदस्य असतात. तर पालकमंञी हे 11 सदस्याची शिफारस करतात.तर नियोजन समीतीचे अनुभव असणाऱ्या 15 सदस्याची नियुक्ती या समितीत केली जाते. या समितीत सोलापूर, माढा,धाराशिव या तिन आमदारांचा व जिल्ह्य़ातील अकरा आमदारांचा या समीतीत समावेश आहे.निमंत्रित सदस्यांना सभागृहात विविध विकास कामावर तसेच झालेला खर्चावर चर्चा करता येते.यांना मतदानाचा हक्क नसतो.निवडुन आलेल्या सदस्यांना (40) मतदानाचा हक्क असतो. सध्या महाराष्ट्रात महायुतीचे म्हणजे तिन पक्षाचे सरकार आहे .यामुळेच जिल्ह्य नियोजन समितीवर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी देणे अपेक्षित आहे.तर सोलापूर जिल्ह्यात सध्या जिल्ह्य परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आहे.महानगरपालिकेवर सुद्धा भाजपचीच सत्ता आहे.तसेच जिल्ह्यातील जवळपास एक पंचायत समिती वगळता सर्व ठिकाणी सत्ता आहे.यामुळेच सध्या जिल्ह्य नियोजन समितीवर भाजपला झुकते माप असणार हे नक्की आहे.भाजपमधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना तशीच अपेक्षा आहे .पण सध्या या रखडलेल्या निवडी कधी होणार याकडे लक्ष लागले आहे .आपलीच जिल्ह्य नियोजन समितीवर निवड व्हावी म्हणून गाॅडफादर मार्फत फिल्डिंग लावुन असुन आपली निवड व्हावी म्हणून अनेकजण देव पाण्यात ठेवुन आहेत.तर निवडणुकीत संधी न मिळालेले महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी ,तसेच निवडणुकीत पराभव झालेले यांची आपली निवड व्हावी अशी अपेक्षा आहे .



















