सोलापूर – जिल्ह्यात व्हॉलीबॉल खेळाचा प्रचार व प्रसार करणे, होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे या प्रमुख उद्देशाने सोलापूर जिल्हा पुरुष गट व्हॉलीबॉल स्पर्धा रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी हरीभाई देवकरण प्रशाला येथे होणार आहे.
ही स्पर्धा व्हॉलीबॉल संघटना, सोलापूर यांच्या मान्यतेने व प्रो स्पोर्ट्स व्हॉलीबॉल अकॅडमी, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा एक दिवसाची (दिवस, रात्र) होणार असून स्पर्धेसाठी प्रवेश फी ३०० रुपये प्रति संघ असणार आहे. यासाठी ( मो. 94224 58035) या नंबरवर संपर्क साधावा.
स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रुपये १५, १०, ७ व ५ हजार व सन्मानचिन्ह असे या स्पर्धेतील प्रथम चार पारितोषिके आहेत, असे प्रो स्पोर्ट्स व्हॉलीबॉल अकॅडमीचे संयोजक अनिल गिराम यांनी कळविले आहे.
——-

















