सोलापूर – कोल्हापूर येथे पार पडलेल्या ‘ २१व्या परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात’ पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी विविध स्पर्धेत यश संपादन केला आहे. त्यांच्या या यशामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची आणि जिल्ह्याची मान उंचावली आहे.
“फारेन्सिक सायन्स रिटन टेस्ट” या स्पर्धेत प्रथम क्रमांक,
“क्रिमीनल इन्व्हेस्टीगेशन क्रिमीनल लाॅ रूल अॅंड प्रोसेजर” या स्पर्धेत द्वीतीय क्रमांक तर “लेबलिंग ,हॅंडलिंग अॅंड पॅकींग टेस्ट” या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी मेहनत, जिद्द, शिस्त आणि व्यावसायिक कौशल्याच्या बळावर हे यश खेचून आणले. कोल्हापूर येथे पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी विविध तांत्रिक आणि पोलीस कर्तव्याशी संबंधित स्पर्धांमध्ये वर्चस्व सिद्ध केले.
त्यांच्या या यशाबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पाल आणि उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक डांगे यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या यशाबद्दल पोलीस सोलापूरचे अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप , मंद्रूप पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, सहायक पोलीस निरीक्षक देविदास कारंडे, पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे आदिंनी अभिनंदन केला आहे.





















