सांगोला – श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने महूद (ता.सांगोला) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नानासाहेब महाराज दुपडे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाआरती झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर हेटकळे महाराज, सयाजी गेंड महाराज, माणिक पाटील महाराज, हरिदास घाडगे महाराज, महादेव कांबळे महाराज, जयवंत नागणे, शंकर महादेवकर, उत्तम गुरव, शुभम खांडेकर, उमेश पाटील, विजय खबाले, बाळासाहेब धोकटे, संजय धोकटे यांच्यासह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.