सांगोला – विचार आणि प्रेरणाचा संगम असलेला राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींच्या जीवन कार्यावर व शिकवणीवर आधारित समर्थ हा मराठी चित्रपट उद्या शुक्रवार दि.१४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अनुग्रहित राम कथाकार रवींद्र पाठक यांनी केली आहे. या चित्रपटाचा ट्रीझर नुकताच पुण्यामध्ये प्रदर्शित झाला होता. तसेच या चित्रपटाचे संगीत अनावरण सोहळा चिंचवड, पुणे मध्ये रसिक प्रेक्षकांसमोर दि.२ जुलै रोजी संपन्न झाला. चित्रपटातील गाणी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, आर्या आंबेकर, रोहित राऊत यांची आहेत. दिग्दर्शक योगेश फुलपगार हे आहेत. कथेचा विस्तार आणि स्क्रीन प्ले तसेच असिस्टंट डायरेक्टर म्हणून सांगोला येथील आशुतोष भोसेकर यांनी काम पाहिले आहे. ते ऍड.विद्याधर भोसेकर व सेवानिवृत्त मुख्याध्यापिका संजीवनी भोसेकर यांचे सुपुत्र आहेत. विचारांचा दीप, प्रेरणेचा प्रवास असे ब्रीदवाक्य असलेला हा चित्रपट इतिहास आणि अध्यात्माची सांगड घालत प्रेक्षकांना एक समृद्ध अनुभव देईल असा विश्वास निर्माते आणि दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे.
Post Views: 16