बार्शी – येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे दि. १२ ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक, भारताचे पहिले ग्रंथपाल, द्विबिंदू वर्गीकरण पध्दतीचा शोध लावणारे संशोधक पद्मश्री डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व राष्ट्रीय ग्रंथपाल दिन वाचनालयात साजरा करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, ऑ. सेक्रेटरी आनंद पुनमिया, संचालक धिरज कुंकूलोळ, आनंद सुराणा, श्री जैनाश्रमचे माजी अध्यक्ष अजित कुंकूलोळ, युवक श्रावक माणिक सुराणा यांच्या हस्ते डाॅ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहा. ग्रंथपाल सौ.शितल लुकडे, क्लार्क विराज पतंगे, यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 10