सोलापूर : ‘जीवनसाथी मॅट्रिमोनी’ ॲपवरून ओळख वाढवून सोलापुरातील एका महिलेची पावणे ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती येथील एका तरुणावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धार्थ देविदास झेंडेपाटील (रा. गावठाण म्हसोबाची वाडी, बारामती, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत राधिका उदय किनकी (वय ३७, रा. ए वसुंधरा अपार्टमेंट, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील आरोपी सिद्धार्थ याने ‘जीवनसाथी मॅट्रिमोनी’ ॲपद्वारे फिर्यादी राधिका यांच्याशी संपर्क साधून ओळख वाढवली. गोड बोलून त्याने त्यांचा पूर्ण विश्वास संपादन केला.
त्यानंतर या ओळखीचा गैरफायदा घेत २८ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत सोलापुरातील मलाबार गोल्डशॉप येथे त्याने राधिका यांच्याकडून ६.८७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि १.२२ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील रिंग मिळून एकूण ३ लाख ७० हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेतले. व ते परत न करता आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार साखरे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 19