सोलापूर – सोलापूर जिल्हा पुरुष व महिला खो-खो संघाच्या कर्णधारपदी अनुक्रमे कृष्णा बनसोडे व कल्याणी लामकाने यांची निवड करण्यात आली.
अहिल्यानगर येथे 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 62व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेसाठी जिल्हा संघ सोलापूर अॅम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड यांनी जाहीर केले.
निवड समिती सदस्य शरद व्हनकडे, प्रा. विजय दत्तू, पुंडलिक कलखांबकर व साक्षी देठे यांनी हे संघ निवडले होते. दोन्ही संघास असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
पुरुष संघाचे प्रशिक्षण शिबिर वेळापूर येथे झाले. शिबिराचा समारोप ग्रामपंचायत सदस्य आबा मंडले, भरत अवार्ड विजेता जावेद आतार, उपसचिव विनायक चंदनशिव, इंग्लिश स्कूल वेळापूरचे क्रीडा शिक्षक सतीश कदम यांच्या उपस्थितीत झाला. महिला संघाचे सराव शिबिर वाडीकुरोली (तालुका पंढरपूर) येथील वसंतराव काळे प्रशालेच्या मैदानावर झाले. या संघास श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे, पर्यवेक्षक कुमार गाजरे, सोलापूर खो-खो असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सहसचिव मोहन रजपूत, नौशाद मुजावर आदी उपस्थित होते.
पुरुष संघ : कृष्णा बनसोडे, अजय कश्यप, आरमान शेख, प्रणव अडसूळ, युवराज शेंडगे, अकबर शेख (अर्धनारी नटेश्वर, वेळापूर), जुबेर शेख, कुणाल तुळसे, प्रतिक शिंदे, फराज शेख (उत्कर्ष, सोलापूर), सुजित मेटकरी, विनायक मुरडे(मंगळवेढा), निरज कोळी (किरण स्पोर्ट्स), माज पठाण(न्यू गोल्डन मंद्रूप ), गणेश शिंदे (दिनबंधू मंद्रूप ), सोमनाथ बनसोडे (प्रशिक्षक), श्रीनाथ खटके (संघ व्यवस्थापक).
महिला संघ : समृद्धी सुरवसे, ऋतुजा सुरवसे, कार्तिकी यलमार, स्नेहा लामकाने, कल्याणी लामकाने, भक्ती चौधरी, कोमल पासले (कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लब, वाडीकुरोली). विद्या आवटे (विट,करमाळा), प्राजक्ता बनसोडे, अश्विनी मांडवे, अनुष्का पवार (अर्धनारी नटेश्वर, वेळापूर), जेनिफर बद्धीपुडी, किर्ती काटे (समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर), सृष्टी नारायणी( रुक्माई स्पोर्टस क्लब सोलापूर), स्नेहा निंबर्गी( किरण स्पोर्टस क्लब सोलापूर). अतुल जाधव (प्रशिक्षक), साक्षी देठे ( संघ व्यवस्थापिका).
—–






















