सोलापूर – श्री मार्कंडेय हायस्कूल, ज्युनि.कॉलेज व श्री सिद्धेश्वर मराठी प्राथमिक शाळा विडी घरकुल, कुंभारी येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्ती, उत्साह आणि आनंदमय वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. प्रारंभी शालेय समिती सदस्य शिवानंद आंदोडगी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर क्रीडा शिक्षक आकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर खडे व बैठे कवायतीचे मनोहारी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली. देशभक्तीपर भाषणातून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला उजाळा देत राष्ट्र प्रेमाची भावना जागृत केली. विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नावर भाष्य करणाऱ्या प्रबोधन पर पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण केले. पर्यवेक्षिका सुमन बिराजदार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना देशप्रेम, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाची प्रेरणा दिली.सहशिक्षक अतुल गोंडाळ यानी दिनविशेष सांगितले. यावेळी पहिली ते बारावी वर्गातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सहशिक्षिका अश्विनी पडनुरकर यांनी बक्षीस वाटपाच्या यादीचे वाचन केले. यावेळी शालेय समिती सदस्य आंदोडगी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना जवळपास अडीच हजार वह्यांचे मदत रूपाने वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्याध्यापक अमोघसिद्ध कुंभार यानी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत असताना सामाजिक बांधिलकीतून आंदोडगी यांच्याकडून सुमारे अडीच हजार वह्यांचे वाटप वाटप ही शिक्षणाच्या वाटेवर विद्यार्थ्यांना बळ देणारे असल्याचे सांगून त्यांच्या या कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक सोमनिंग म्हमाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






















