सोलापूर : महाराष्ट्रातील बालनाट्य क्षेत्राचा सखोल अभ्यास करण्याच्या उद्देशाने दि प्रोग्रेसिव्ह सोसायटी उर्दू हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक तसेच बालनाट्य लेखक, दिग्दर्शक व कलाकार एजाज मंजूरआलम शेख यांनी सोशल महाविद्यालयातील उर्दू संशोधन केंद्रातून “महाराष्ट्र में बच्चों के ड्रामे: माज़ी, हाल और मुस्तकबिल के इमकानात का ताहक़ीकी व तनक़ीदी जायज़ा” या विषयावर आपले शोधनिबंध सादर करून पीएच.डी. डिग्री पूर्ण केली.
या संशोधनासाठी त्यांना डॉ. गौसअहमद शेख यांचे मार्गदर्शन लाभले. एजाज मंजूरआलम शेख हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे महाराष्ट्र राज्यचे प्रवक्ते म्हणूनही ते कार्यरत आहेत. तसेच त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे माजी सिनेट सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
शिक्षण, सामाजिक कार्य, बालनाट्य आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या एजाज शेख यांच्या पीएच.डी. संशोधनामुळे महाराष्ट्रातील बालनाट्याच्या इतिहासासोबतच त्याची वर्तमान स्थिती आणि भविष्यातील वाटचाल यावर महत्त्वपूर्ण संशोधनात्मक प्रकाश पडणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या पीएच.डी. मिळाल्याबद्दल सोशल महाविद्यालयातील उर्दू संशोधन केंद्राचे सदस्य संशोधन मार्गदर्शक व उर्दू विभागाचे उपविभाग प्रमुख डॉ. गौसअहमद शेख तसेच प्र. प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















