सोलापूर : दैनिक तरुण भारतचे उपसंपादक किरण बनसोडे लिखित आणि जागृती पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मीडिया मास्टर’ या पत्रकारितेची गुरुकिल्ली ठरणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बुधवार दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी
सकाळी ११ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह,
श्री सिद्धेश्वर मंदिर शेजारी, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली.
या पुस्तकाचे प्रकाशन केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार खा. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजीराव शिंदे, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने, ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड, बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, दैनिक तरुण भारतचे समूह मुख्य संपादक दिलीप पेठे, मुख्य संपादक प्रशांत माने, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, आर्यनंदी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. राजेश फडकुले, डॉ. सुरेश कोरे आणि दिव्य मराठीचे उपसंपादक विजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या नवोदितांसह विद्यार्थी, पत्रकार आणि माध्यमासह शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी ‘मीडिया मास्टर’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. पत्रकारितेतील विविध पैलू, लेखनकौशल्य आणि माध्यम क्षेत्रातील आवश्यक बाबी समजून घेण्यासाठी पुस्तक उपयुक्त आहे.
या प्रकाशन सोहळ्यास मित्रपरिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन लेखक किरण बनसोडे यांनी केले आहे.
Post Views: 25