चिंचोली, ता. बार्शी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचोली येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये भर घालणाऱ्या नवीन वर्गखोलीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उभारण्यात आलेल्या या नवीन वर्गखोलीमुळे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर पडली आहे.
या नवीन वर्गखोलीचे उद्घाटन श्रीमती शोभा शिंदे मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर विलास काळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पांगरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कालिदास. पाटील साहेब, बांधकाम विभागाचे गिराम साहेब, पंचफुला बगाडे मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी गावचे सरपंच अमरभैया कसबे, उपसरपंच राजश्रीताई शिंदे, सीमाताई शिंदे, परागभैय्या शिंदे- सॉफ्टवेअर इंजिनियर , चिंचोली गावचे ग्रामसेवक चंद्रकांत जगताप भाऊसाहेब, अजितभैया शिंदे, सत्यजित भैया शिंदे , प्रशांत भैय्या काळेल, धनाजी पाटील सर गावचे पत्रकार बाबासाहेब शिंदे सर , ज्येष्ठ पत्रकार अनिल खुने सर,तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप भैय्या डोळे, उपाध्यक्ष उमेश दादा शिंदे, चिंचोली गावचे पोलीस पाटील श्री सुरेश दादा शिंदे, ग्रामस्थ श्री कमलाकर पाटील सर,श्री नामदेव काळेल सर, श्री संदीप पाटील सर, श्री जयसिंग शिंदे, श्री नानासाहेब शिंदे, श्री भीमा बाराते, श्री अमोल शिंदे, श्री दिलीप शिंदे, श्री धनंजय शिंदे, श्री दत्तात्रय शिंदे सर, श्री विक्रम शिंदे, श्री विशाल शिंदे, श्री विजय शिंदे, श्री अरविंद शिंदे, श्री शिवाजी काळेल, डॉक्टर सुधीर शिंदे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पत्रकार बंधू ,पालक, महिला वर्ग, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नवीन वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी नवीन वर्गखोलीची पाहणी करून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
“सुंदर आणि सुसज्ज वर्गखोली ही केवळ इमारत नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे,” असे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले. नवीन वर्गखोलीमुळे विद्यार्थ्यांना आनंददायी, सुरक्षित वातावरण मिळेल व शाळा विकासासाठी हातभार लागेल असे प्रतिपादन पांगरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पाटील साहेब यांनी केले. 2025- 26 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण, विविध स्पर्धांमधील बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले तसेच महिलांसाठी राबविलेल्या कला कार्यानुभव प्रदर्शनातील तीन क्रमांकाचे यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले.अगदी घरगुती पद्धतीच्या कार्यक्रमासारखे सर्व पालकांनी शाळेसाठी विविध भेटवस्तू दिल्या. शाळेच्या शिक्षिका श्रीमती चौधर मॅडम व नाझरे मॅडम या दोघींनी हा कार्यक्रम पार पाडला. सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत आजचा देखणा कार्यक्रम पार पाडला.
Post Views: 18