अक्कलकोट – येथील कै. कल्याणराव इंगळे पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये मराठी साहित्य परिषद, शाखा अक्कलकोट आयोजित ‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलनाची’ हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागनळळी शिक्षण संकुलास ‘आदर्श आश्रमशाळा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकोटचे नगराध्यक्ष श्री. मिलन कल्याणशेट्टी उपस्थित होते. व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री. महेश इंगळे, मराठी साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कार्यवाह सुनील महाजन, अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त श्री. अमोलराजे भोसले, अक्कलकोट शाखा अध्यक्षा शैलशिल्पा जाधव, सोलापूर जिल्हा प्रमुख पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
नागनळळी शिक्षण संकुलाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेल्या भरीव योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेचे सचिव मा. श्री. जावेद पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपाध्यक्ष श्री. जलील पटेल, प्रा. मनोज जगताप व शंभुलिंग बशेट्टी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
संस्थेचे मनोगत:
“हा पुरस्कार म्हणजे आमच्या गुणवत्तापूर्ण व विद्यार्थी-केंद्रित कार्याची पोचपावती आहे. या यशामुळे संपूर्ण संकुल, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मोठी प्रेरणा मिळाली आहे.” असे मत संस्थेचे अध्यक्ष जावेद पटेल यांनी व्यक्त केले.
Post Views: 15