अकलूज – राऊत नगर अकलूज येथील संकेतिका सार्वजनिक वाचनालयास स्वर्गीय चाँदसाहेब मिटू सय्यद यांच्या स्मरणार्थ सय्यद परिवाराच्या वतीने ईद-ए-मिलाद च्या पवित्र सणाचे औचित्य साधून 119 प्रेरणादायी पुस्तकांचा संच भेट देण्यात आला या सोहळ्यास संपूर्ण सय्यद परिवार संकेतिका वाचनालयाचे अध्यक्ष मारुती क्षीरसागर , सचिव व सर्व संचालक मंडळ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज नगर परिषदेच्या नगरसेविका सौ.वैशाली धनाजी भोसले ,कथाकार लेखक विरेंद्र पत्की ,श्री गणपत जाधव ,श्री दिलीप मुळे ,डॉक्टर प्रेमनाथ रामदासी, तसेच पत्रकार श्री हुसेन मुलाणी , डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील, श्री भास्कर जोशी ,केंद्रप्रमुख जावेद मुलाणी , राऊतनगरचे कार्यकर्ते श्री हमीद मुलाणी .श्री बाळासाहेब वाघे, श्री अशोक राजगुरू तसेच पत्रकार ,वकील, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी श्री भास्कर जोशी यांचेकडून संकेतिका वाचनालयास 5001 रुपये आर्थिक साह्य देण्यात आले तसेच या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय गायकवाड सर यांनी केले
Post Views: 52